पोवाडे, लावणीतून घुमतोय ‘बेटी बचाओ’चा सूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 01:16 AM2017-11-24T01:16:03+5:302017-11-24T01:17:18+5:30

स्त्री भ्रूणहत्येचे वाढते प्रमाण पाहता ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या  मुद्याला धरून जनजागृती करण्याच्या दृष्टीने औरंगाबादमधील जयभवानी  कलापथक जिल्हय़ातील दुर्गम आदिवासी भागातील वाड्या वस्तीवर जागृती  करत असल्याने पोवाडे, लावणीतून ‘बेटी बचाओ’चा सूर घुमत आहे.

Powade, the sound of 'Beti Bachao' roaming through the planting! | पोवाडे, लावणीतून घुमतोय ‘बेटी बचाओ’चा सूर!

पोवाडे, लावणीतून घुमतोय ‘बेटी बचाओ’चा सूर!

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबादचे कलापथक करतेय जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: स्त्री भ्रूणहत्येचे वाढते प्रमाण पाहता ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या  मुद्याला धरून जनजागृती करण्याच्या दृष्टीने औरंगाबादमधील जयभवानी  कलापथक जिल्हय़ातील दुर्गम आदिवासी भागातील वाड्या वस्तीवर जागृती  करत असल्याने पोवाडे, लावणीतून ‘बेटी बचाओ’चा सूर घुमत आहे. जिल्हा  महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत आतापर्यंत २0 गावात हे  अभियान राबविण्यात आले आहे. 
जिल्ह्यातील मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमी असलेल्या गावांमध्ये ‘बेटी  बचाओ, बेटी पढाओ’ अभियानासारखे विविध उपक्रम शासनस्तरावरून  राबविले जात आहेत. भारत सरकारच्या ग्रामीण विकास सूचना व प्रसारण  मंत्रालय महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली, गीत  आणि नाटक विभाग पश्‍चिम क्षेत्र पुणे जिल्हा महिला व बाल विकास  अधिकारी बुलडाणाच्यावतीने जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे.  औरंगाबाद येथील जयभवानी कलापथक मंडळ व मंडळाचे अध्यक्ष शहीर  लक्ष्मण किसनराव मोकासरे हे बुलडाणा जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासी  भागातील वाडी, वस्ती आणि तांड्यावर बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्त्री भ्रूणह त्या, स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती करीत आहेत. बुलडाणा, चिखली व  मोताळा तालुक्यातील जवळपास २0 गावांमध्ये औरंगाबादचे जयभवानी कला पथक मंडळ पोहचले असून, पोवाडे, लावणी, बतावणी लोकगीत, संगीत  सोंगी, भारूडच्या माध्यमातून जागृती करण्यात आली आहे. 

Web Title: Powade, the sound of 'Beti Bachao' roaming through the planting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.