पाणी पुरवठा योजनेचे वीज कनेक्शन कापले; निमखेड येथील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 03:21 PM2018-02-03T15:21:02+5:302018-02-03T15:23:06+5:30
निमखेड : निमखेड येथील ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजनेचे बिल थकल्याने वीज कंपनीने तातडीने वीज पुरवठा खंडीत केला. यामुळे मागील सात ते आठ दिवसापासून पाण्याचा प्रश्न बिकट झाल्यामुळे जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे.
निमखेड : निमखेड येथील ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजनेचे बिल थकल्याने वीज कंपनीने तातडीने वीज पुरवठा खंडीत केला. यामुळे मागील सात ते आठ दिवसापासून पाण्याचा प्रश्न बिकट झाल्यामुळे जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे.
दिवसेंदिवस खोल जात असलेली पाणी पातळी यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. हिवाळ्यात पाण्याचे स्त्रोत आटले असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. अशातच नांदुरा तालुक्यातील निमखेड येथील ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजनेचे बिल न भरल्यामुळे नागरिकांची विशेषत: महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. या गंभीर समस्येकडे माद्ध मागील सात ते आठ दिवसापासून संबधीतांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
पाणी असूनही, घशाला कोरड
निमखेड या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी दोन विहीरी आहे. यंदा पाऊस चांगला झाला असल्याने सध्या त्या विहिरींना भरपूर पाणी सुध्दा उपलब्ध आहे. मात्र ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजनेचे थकीत वीज बिलच न भरल्यामुळे पाणी असूनही निमखेडवासीयांच्या घशाला कोरड पडली आहे.
शेतातून आणावे लागते पाणी
गावाबाहेर असलेले तीन हातपंप सुरु आहे. परंतु त्यांचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने महिलांना शेजारील शेतात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तरी वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणी प्रश्न सोडवावा, अशी महिला मंडळाकडून मागणी होत आहे. (वार्ताहर)