सक्तीच्या वसुलीने वीज ग्राहक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:52 AM2021-02-23T04:52:47+5:302021-02-23T04:52:47+5:30
मुख्यालयी राहणे गरजेचे असताना कनिष्ठ अभियंत्यासह एकही कर्मचारी गावात राहात नाही.त्यामुळे गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागतो. काही अनधिकृत ...
मुख्यालयी राहणे गरजेचे असताना कनिष्ठ अभियंत्यासह एकही कर्मचारी गावात राहात नाही.त्यामुळे गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागतो. काही अनधिकृत व्यक्तीमार्फत वीज महामंडळाच्या नावाखाली लोकांकडून वसुली करतात व पावती देत नाहीत अशी गावात चर्चा आहे. गावामध्ये अनेक डमी मीटर बसवलेले आहेत. त्यांची विनापावती वसुली केली जाते. त्यामुळे धामणगाव येथील प्रत्येक मीटरची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे वीज महामंडळाला दर महिन्याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे तर दुसरीकडे जे प्रामाणिकपणे वीज बिल भरत आहेत त्यांचे वीज कनेक्शन कापण्याची धमकी दिली जाते. गावामध्ये असलेल्या अनधिकृत डमी वीज मीटरबाबत कनिष्ठ अभियंता डहाके यांना विचारणा केली असता डमी मीटरचा शोध घेतल्यास वीज मंडळाचा फायदा होईल असे सांगितले.यासंदर्भात वीज महामंडळाचे अभियंता विवेक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची ॲलर्जी
धामणगाव बढे येथे एकही कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्यामुळे गावकऱ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल नुकतेच एक निवेदन ग्रामपंचायतीतर्फे संबंधितांना देण्यात आले.
कर्मचारी जर दादागिरी करत असतील तर स्वाभिमानी संघटना त्यांना धडा शिकवेल. त्यासाठी आंदोलन करावे लागले तरी ते केले जाईल. तसेच यासंदर्भात संबंधितांशी बोलतो. कारण सर्वत्र बिकट परिस्थिती आहे. प्रश्न सुद्धा मार्गी लावू अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी यासंदर्भात बोलताना दिली.