वारीच्या धरणावरील वीज निर्मिती संच सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 11:16 AM2020-06-28T11:16:34+5:302020-06-28T11:16:47+5:30
सद्यास्थिती या वीज निर्मिती संचावर दररोज ८ ते १० तास वीज निर्मिती करण्याचे काम सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : अमरावती अकोला बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेले वारी येथील हनुमान सागर धरणावर वीज निर्मिती संच २५ जून रोजी सुरू करण्यात आले आहे. गत १३ वषार्पासून धरणातील पाण्याची पातळी प्रमाणे वीज निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. या वीज निर्मिती संचाची क्षमता १ हजार ५०० किलो वॅट असून सध्या स्थिती १ हजार किलो वॅट विद्युत निर्मिती करण्यात येत आहे.
या विद्युत संचाची क्षमता दररोज ३६ हजार युनिटची आहे. यामधून दररोज २० ते २५ हजार युनिट जनरेट होत आहेत. येथून अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील उपकेंद्राला विद्यूत पुरवठा करण्यात येत आहे. गत तेरा वषार्पासून धरणातील पाण्याची पातळीप्रमाणे हे विद्युत निर्मिती अबाधित सुरू आहे. वारी येथील हनुमान सागर धरणाची समुद्रसपाटीपासून उंची ४०३.५१ मिटर असून सध्या स्थिती या धरणात ४१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या विद्यूत निर्मिती संचाची प्रथम चाचणी २७ फेब्रुवारी २००७ रोजी करण्यात आली होती. प्रत्यक्ष वीज निर्मितीला १३ आॅगस्ट २००७ पासून प्रारंभ करण्यात आला. २६ जून २०२० पर्यंत या संचावरून १ कोटी १८ लाख ६२ हजार ८६० यूनिट वीज तयार करण्यात आली आहे. यावषीर्ही जलसाठ्याप्रमाणे वीज निर्मिती करण्यात येणार आहे. सद्यास्थिती या वीज निर्मिती संचावर दररोज ८ ते १० तास वीज निर्मिती करण्याचे काम सुरू आहे.
धरणातून शेकडो गावांना पिण्यासाठी पाणी
वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणावरून अकोला जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील असंख्य गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १४० गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील गावांना जलवाहिनीच्या माध्यमातून शुद्ध पाणीपुरवठा सुरू आहे. तर शेगाव शहरालाही पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात येत आहे.