वीज अधिकारी- कर्मचाऱ्यांचेच आत्मक्लेश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 09:54 PM2020-09-30T21:54:00+5:302020-09-30T21:54:14+5:30
आंदोलनाअंर्तगत अभियंते, तंत्रज्ञ आणि वीज कामगार आपल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी थांबत निषेध नोंदवित आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: विद्युत क्षेत्रातील खासगीकरण आणि कर्मचारी कपातीच्या निषेधार्थ सब ऑरडीनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने बुधवारी कार्यालय संपल्यानंतर आत्मक्लेशन आंदोलनास सुरुवात करण्यात आली. या आंदोलनाअंर्तगत अभियंते, तंत्रज्ञ आणि वीज कामगार आपल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी थांबत निषेध नोंदवित आहेत.
विद्युत क्षेत्रातील खासगीकरण आणि कर्मचारी कपातीच्या निषेधार्थ सब आॅर्डीनेट इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने २३ सप्टेंबर पासून टप्याटप्याने आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. यामध्ये काळी फित आंदोलन, द्वार सभा, व्हाट्सअप ग्रुप आणि अतिरीक्त चार्ज छोडो आंदोलन करण्यात आले. त्यानंतर बुधवारी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी कार्यालयात थांबत तर फिल्डवरच्या कर्मचाऱ्यांनी फिल्डवर थांबत आत्मक्लेश आंदोलन पुकारले. बुधवारी कार्यालय संपल्यावर सायंकाळी सुुरु झालेले आंदोलन रात्री उशिरा पर्यंत सुरु होते. या आंदोलनात विभागीय अध्यक्ष विनोद थाटे, विभागीय सचिव अजय गावंडे, डी. पी. वक्टे, शेट्टे, चौधरी, ठाकरे, श्री पाटील, देव, नागरे, दुबल, मुस्तफा बोहरा आदी सहभागी झालेत.
खासगीकरणा विरोधात आंदोलन छेडण्यात आले असून या आंदोलनात कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत, या आंदालनामुळे वीज ग्राहकांना त्रास देण्याचा कोणताही उद्देश नाही.
- डी.पी. वक्ते
सदस्य, सब आॅर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, बुलडाणा