चिंचपूर परिसरात वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:36 AM2021-08-23T04:36:21+5:302021-08-23T04:36:21+5:30

अर्धवट कामांमुळे वाहनधारक त्रस्त सिंदखेडराजा : तालुक्यातील किनगावराजा ते रोहणा फाटा मार्गावरील पुलाचे काम अर्धवट असल्याने वाहनधारकांना त्रास सहन ...

Power outage in Chinchpur area | चिंचपूर परिसरात वीजपुरवठा खंडित

चिंचपूर परिसरात वीजपुरवठा खंडित

Next

अर्धवट कामांमुळे वाहनधारक त्रस्त

सिंदखेडराजा : तालुक्यातील किनगावराजा ते रोहणा फाटा मार्गावरील पुलाचे काम अर्धवट असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे़ पुलाच्या बाजूने काढलेल्या पर्यायी मार्गावर पावसामुळे चिखल साचला आहे़ या चिखलातून वाहने काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे़ या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी हाेत आहे़

प्रकल्पांना दमदार पावसाची प्रतीक्षा

बुलडाणा : गत तीन ते चार दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस झाला़ हा पाऊस पिकांसाठी चांगला असला तरी माेठ्या प्रकल्पांच्या क्षेत्रांमध्ये अजूनही दमदार पाऊस झालेला नाही़ त्यामुळे प्रकल्पांच्या जलसाठ्यांत वाढ झालेली नाही़ माेठ्या प्रकल्पांनी अजूनही तळ गाठलेले आहेत़

व्हायरल फिव्हरची साथ, नागरिक त्रस्त

बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने व्हायरल फिव्हरची साथ सुरू आहे़ अनेकांना सर्दी, खाेकला आणि तापाने ग्रासले आहे़ काेराेनाचीही हीच लक्षणे असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे़

चिखली ते मेरा बु बसफेरी सुरू

चिखली : चिखली : तालुक्यातील मेरा बुची बससेवा दाेन वर्षांपासून बंद असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत हाेता. त्यामुळे, बसफेरी सुरू करण्याची मागणी हाेत हाेती. नुकतीच ही बसफेरी सुरू केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Power outage in Chinchpur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.