डाेणगाव परिसरात विजेचा लपंडाव; ग्रामस्थ त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:40 AM2021-09-15T04:40:07+5:302021-09-15T04:40:07+5:30

डाेणगाव परिसरात गत काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे़ एकदा बंद झालेला वीज पुरवठा केव्हा पूर्ववत हाेईल याची काहीही ...

Power outage in Daengaon area; The villagers are distressed | डाेणगाव परिसरात विजेचा लपंडाव; ग्रामस्थ त्रस्त

डाेणगाव परिसरात विजेचा लपंडाव; ग्रामस्थ त्रस्त

googlenewsNext

डाेणगाव परिसरात गत काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे़ एकदा बंद झालेला वीज पुरवठा केव्हा पूर्ववत हाेईल याची काहीही शाश्वती नाही़ गत काही दिवसांपासून २४ तास वीज पुरवठा बंद राहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या गणेशाेत्सव, गौरीपूजन व इतर सण उत्सव आहेत़ लाइन नसल्यामुळे गृहिणींना त्याचा त्रास होत आहे. सततच्या पावसामुळे डाेणगाव परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे़ त्यामुळे, डासांची निर्मिती हाेऊन डेंग्यू, मलेरियासाख्या आजारांची साथ सुरू आहे़ वीज पुरवठा सुरळीत न राहिल्यामुळे व्यापारी वर्गाचे व्यावसायिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे़ त्यामुळे वारंवार खंडित हाेत असलेला वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी भाजपच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे़ भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन वानखेडे, डाेणगाव शहर अध्यक्ष विलास परमाळे, सागर बाजड, गणेश जाधव, भाजप शहर उपाध्यक्ष आकाश बाजड यांच्या मार्गदर्शनात विजूभाऊ पंडितकर, आकाश बाजड, जयपाल मिस्तरी, बबनराव भुजबळ, भागवत पवार, साजन शाहा, विशाल मुंडे, विजय गांवडे, शंकर केधळे, कार्तिक गोरे आदींनी निवेदन दिले़

140921\new doc 2021-09-14 14.45.27_1.jpg

निवेदन देताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अर्जूनराव वानखेडे

Web Title: Power outage in Daengaon area; The villagers are distressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.