मोताळा तालुक्यातील प्रदीपने आंतरराष्ट्रीय स्तरावर पटकावले सुवर्ण पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:53 AM2017-12-25T00:53:31+5:302017-12-25T00:54:49+5:30
मोताळा (बुलडाणा): तालुक्यातील उबाळखेड येथील श्री चांगदेव विद्यालयातील माजी विद्यार्थी प्रदीप जाधव याने दिल्ली येथे गुरूवारला मिक्स मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक पटकाविले.
लोकमत न्यूज नेटवर्क

तालुक्यातील नळकुंड या छोट्याश्या गावातील रहिवाशी प्रदीप दिवानसिंग जाधव याने बालपणी बिकट परिस्थितीत उबाळखेड येथील श्री चांगदेव विद्यालयात शिक्षण घेतले. शिक्षणासाठी पुरेसे पैसे नसल्याने या शाळेतील शिक्षकांनी त्याला शिक्षणासाठी मदत केली. तसेच प्राथमिक शाळेत असताना सद्यस्थितीत रोहिणखेड केंद्राचे केंद्र प्रमुख नीळकंठ नाफडे यांनीसुद्धा प्रदीपला मदतीसह मार्गदर्शन केले. विद्यालयात आले असताना विद्यालयाचे प्राचार्य अनिल चव्हाण यांनी सतत मार्गदर्शन केले. पुणे येथील किंग ऑफ रिंग या संघटनेमार्फत मिक्स मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेत असताना प्रदीपची आंतरराष्ट्रीयस्तर स्पर्धेकरिता निवड झाली. या स्पर्धेत १८ ते ४६ वयोगटात प्रदीपने उत्कृष्ट कामगिरी बजावत सुवर्ण पदक मिळविले.