प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा ठरली कुटुंबाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:34 AM2021-04-18T04:34:22+5:302021-04-18T04:34:22+5:30

धामणगाव बढे : केंद्र शासनाची प्रधानमंत्री जीवन विमा योजना घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबाचा आधार ठरत ...

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima became the basis of the family | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा ठरली कुटुंबाचा आधार

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा ठरली कुटुंबाचा आधार

Next

धामणगाव बढे : केंद्र शासनाची प्रधानमंत्री जीवन विमा योजना घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबाचा आधार ठरत असून त्याअंतर्गत धनादेशाचे वितरण मृतकाच्या वारसास भारतीय स्टेट बँक धामणगाव बढे येथे नुकतेच करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी रिधोरा येथील गजानन सूर्यवंशी यांचे आकस्मिक निधन झाले होते. धामणगाव बढे येथील भारतीय स्टेट बँकेमार्फत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जीवन विमाअंतर्गत त्यांच्या पत्नी पूनम गजानन सूर्यवंशी यांना शाखा व्यवस्थापक राजेश सोनवणे यांच्या हस्ते दोन लाखांचा मृत्युदावा प्रदान करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने सहायक व्यवस्थापक कुणाल बॅनर्जी, राहुल चव्हाण उपस्थित होते. मागील वर्षात प्रधानमंत्री जीवन विमा योजनेंतर्गत चार व्यक्तींना मृत्युदावा प्रदान करण्यात आला आहे. वार्षिक १२ रुपये, ३२० रुपये व २०० रुपये अत्यल्प प्रीमियम घेऊन शेतकरी, जनधन खातेधारक व इतर खातेदारांसाठी केंद्र शासनाची ही योजना भारतीय स्टेट बँकेमध्ये राबविली जाते आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामाजिक सुरक्षा निर्माण व्हावी, यासाठी केंद्र शासन ही योजना राबवत आहे. त्याचे सकारात्मक परिणामसुद्धा दिसत आहेत़

Web Title: Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima became the basis of the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.