जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत जामोदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 03:30 PM2022-10-13T15:30:38+5:302022-10-13T15:30:44+5:30
Prashant Jamode : प्रशांत जामोदे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
नांदुरा : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत जामोदे यांची निवड करण्यात आली आहे . बुलढाणा जिल्हा कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेची नवीन कार्यकारिणीची निवड माजी सचिव अशोक मुळे यांनी नुकताच एका पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. प्रशांत जामोदे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी अनंतराव जाधव, सचिव पदी कुणाल चिंचोले, सहसचिव पदी संजय राऊत , कोषाध्यक्ष नंदकिशोर उगले. संघटक किशोर अवचार. स्वप्निल बाहेकर. सल्लागार अनिल शेळके. महिला प्रतिनिधी नीता महाजन. उपाध्यक्ष मनीषा डोंगरे. राज्य संघटना प्रतिनिधी सुधीर दाभाडे यांची निवड झाल्याचे अशोक मुळे यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे. नवीन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे प्रशांत जामोदे यांनी यापूर्वी ग्रामसेवक संघटनेमध्ये तालुका अध्यक्ष पासून ते राज्यसरचिटणीस पदापर्यंत विविध पदावर काम केलेले आहे. त्यांच्या कार्यकाळात ग्रामसेवक संघटनेचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीमुळे जिल्हाभरात ग्रामसेवक संवर्ग व विस्तार अधिकारी इतर कर्मचारी संवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा संघटना अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कामात सुरुवात केलेली असून गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित विस्तार अधिकारी कृषी ची सेवा जेष्ठता यादी त्यांनी मंजूर करून घेतलेली आहे तसेच जिल्हास्तरावरचे इतरही प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे त्यांचे मानस आहेत त्यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदननाच वर्षाव होत आहे राज्य कार्यकारणी राज्य अध्यक्ष मोहनराव दाभाडे राज्य सरचिटणीस सचिन चव्हान यांनी प्रशांत जामोदे यांचे दूरध्वनी द्वारे विशेष अभिनंदन केले आहे या नियुक्तीमुळे परिसरात व कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.