खामगाव व बुलडाण्यात गुरूद्वारांमध्ये होणार प्रार्थना
By admin | Published: November 5, 2014 11:53 PM2014-11-05T23:53:08+5:302014-11-05T23:53:08+5:30
दिनविशेष : गुरू नानक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
नाना हिवराळे /खामगाव (बुलडाणा)
जिल्ह्यातील सर्वांत मोठा गुरुद्वारा खामगाव शहरात आहे. सन १९४५ साली शहरातील शीख समाजाचे अध्यक्ष मनमोहनसिंग शीख यांच्या पुढाकाराने गुरुद्वाराची स्थापना करण्यात आली. सर्वधर्म समभावाचा संदेश मानवजातीला देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्या सेवा, सिमरन, एकता व बंधुत्व या शिकवणीचा अंगीकार समाजबांधवांकडून होत आहे. गरीब, कष्टकरी, भुकेल्यांना अन्नदान समाजबांधवांकडून करण्यात येते. खामगाव शहरात एक हजाराच्या जवळपास शीख बांधवांची संख्या आहे. खामगाव शहराबरोबरच जिल्ह्यात समाज विस्तारला आहे. दरवर्षी गुरू नानक यांच्या जयंतीनिमित्त गुरुद्वारा श्री गुरुसिंघ सभा, खामगाव यांच्या वतीने लोकोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. जयंती पर्वावर प्रभात फेरी, कथा, कीर्तन तसेच ह्यगुरू ग्रंथसाहिबह्ण या धर्मग्रंथाचे वाचन केले जाते.
देवाला हृदयात ठेवा, प्रामाणिकपणे जगा, भरपूर कष्ट करा, सर्वांशी समान वागा, मानवजा तीसोबत प्राण्यांची सेवा करा, दैवावर जास्त विश्वास ठेवू नका अशा प्रकारची शीख धर्माची शिकवण जयंती निमित्ताने दिली जाते.
*बुलडाण्यात २१ वर्षांची अखंडित परंपरा
बुलडाणा : येथील गुरू नानक सेवा समितीतर्फे यावर्षी गुरू नानक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शीख, पंजाबी व सिंधी समाजबांधवांतर्फे २१ वर्षांपासून सुरू असलेलेली परंपरा आजही जोपासण्यात येत आहे. बुलडाणा शहर जिल्ह्याचे ठिकाण असले तरी शिख, पंजाबी व सिंधी बांधवांचे जवळपास १५0 कुटुंब आहेत, तर लोकसंख्या जवळपास ८00 आहे. वर्षभर आपल्या विविध व्यवसायात मग्न असलेले शीख, पंजाबी व सिंधी समाजबांधव गुरू नानक जयंतीनिमित्त एकत्र येतात. यावर्षीही तिन्ही समाजबांधवांनी एकत्र येऊन गुरू नानक जयंती उत्साहात साजरी करण्याचे नियोजन केले आहे.