मेहकरात पावसासाठी वरुणराजाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 03:01 PM2019-06-22T15:01:40+5:302019-06-22T15:01:46+5:30

येथील तालुका दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष सिताराम ठोकळ यांनी सपत्नीक वरुणराजाला आगमनासाठी पूजा करून साकडे घातले आहे.

Praying for rain in Mehkar | मेहकरात पावसासाठी वरुणराजाला साकडे

मेहकरात पावसासाठी वरुणराजाला साकडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : मागील वर्षी जून महिन्यातील तालुक्यातील पावसाची एकूण नोंद बघता यावर्षीची परिस्थिती चिंताजनक आहे. २० जून पर्यंत पाऊस न झाल्याने तालुक्यातील पेरणीचे नियोजन कोलमडले आहे. दरम्यान, येथील तालुका दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष सिताराम ठोकळ यांनी सपत्नीक वरुणराजाला आगमनासाठी पूजा करून साकडे घातले आहे.
गतवर्षी खरीप हंगामा सोबतच रब्बी हंगाम सुद्धा शेतकऱ्यांचा संकटात गेला . पावसाच्या अल्प प्रमाणामुळे मेहकर तालुक्यातील दहा मंडळांमध्ये शासनाच्यावतीने दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. तालुक्यातील पेनटाकळी, कोराडी प्रकल्पासह इतर लहान जलाशयातील पाणी उपसा बंद केल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी शेती सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. त्यामुळे रब्बी हंगाम नुकसानीत गेला. यासोबतच बाजार भाव कोसळल्यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. या वर्षीची परिस्थिती त्याहूनही भीषण दिसत आहे. गतवर्षी दहा महसूल मंडळात एक ते २० जून पर्यंत पाऊस पडल्यामुळे शेतीची कामे सुरळीत सुरू झाली होती. परंतू यावर्षी अद्याप पावसाची नोंद न झाल्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. शेतकºयांचे शेतातील पूर्वमशागतीची कामे तालुक्यातील बºयाच ठिकाणी खोळंबले आहेत. बºयाच शेतकºयांनी पूर्वमशागतीची कामे केली. मात्र पाहिजे त्या प्रमाणात ही कामे झाली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पाऊस लाबंल्यामुळे पेरणी चे नियोजन कोलमडले असून यावर्षी सोयाबीन, तूर व हायब्रीड या पिकाचा पेरा होण्याची शक्यता आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी शासनाच्या वतीने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर लावण्यात आले असून खाजगी टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. पावसाचे अजून आगमन न झाल्यामुळे यावर्षी शेतकºयांसह सर्वांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
तालुक्यात ठिकठिकाणी वरुणराजाला साकडे घालण्यात येत आहेत. यामध्ये मेहकर तालुका दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष सिताराम ठोकळ महाराज यांच्यासह गोपाल पितळे, डॉ. शेषराव बदर, नारायण नागोलकर यांनी वरून गाजला साकडे घातले आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Praying for rain in Mehkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.