बुलडाणा जिल्ह्यात मान्सुनपुर्व पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 02:10 PM2019-06-09T14:10:58+5:302019-06-09T14:11:05+5:30
बुलडाणा: मान्सूपूर्व पावसाने सात जून रोजी जिल्ह्यातील नऊ तालुक्यात हजेरी लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: मान्सूपूर्व पावसाने सात जून रोजी जिल्ह्यातील नऊ तालुक्यात हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पडलेल्या या पावसामुळे खामगाव व बुलडाणा शहर परिसरात काहीसे नुकसान केले. दरम्यान, यंदाच्या मोसमातील हा पहिलाच पाऊस ठरला. त्याची सरासरी ४.१ मिमी नोंद झाली आहे.
बुलडाणा शहरातही मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वेगवान वाºयासह जवळपास अर्धास हा पाऊस बरसत होता. पावसाचे आगमन होताच शहरातील वीज पुरवठा खंडीत झाला तो पहाटेच सुरळीत झाला. या पावसामुळे शहरातील काही ठिकाणची टीनपत्रे उडाली. बालाजी मंदिरामधील यज्ञ कुंडाचे छत उडून गेले. पोलिस ग्राऊड परिसरातील काही झाडे वादळी पावसामुळे उन्मळून पडली. मात्र पडलेल्या या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
दुसरीकडे खामगाव तालुक्यातही पावसाने हजेरी लावली होती. यामध्ये शहरातील कॉटन मार्केटमधील फिडर बंद पडल्याने शहराचा वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. जलंब नाका परिसरातील झाडाची फांदी तुटल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. जिल्ह्यातील पहिल्याच मान्सूनपूर्व पावसाने मेहकर व बुलडाणा तालुक्यात दमदार हजेरी लावली. मेहकर तालुक्यात १२.७ मिमी तर बुलडाणा तालुक्यात १०.३ मिमी या पावसाची नोंद झाली. खामगावमध्ये ८.६ मिमी, लोणारमध्ये सात मिमी, चिखलीमध्ये ६.९ मिमी देऊळगाव राजात २.४ मिमी तर सिंदखेड राजा तालुक्यात ४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शेगाव आणि मोताळा तालुक्यातही तुरळकप्रमाणात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी ४.१ मिमी पाऊस ८ जून रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात पडला होता. (प्रतिनिधई)