गरोदर माता व बालकांचे आरोग्य धोक्यात!

By Admin | Published: August 16, 2015 11:58 PM2015-08-16T23:58:20+5:302015-08-16T23:58:20+5:30

ग्रामीण रुग्णालयाकडून लसीकरणाचा पुरवठा बंद.

Pregnant mothers and children's health risks! | गरोदर माता व बालकांचे आरोग्य धोक्यात!

गरोदर माता व बालकांचे आरोग्य धोक्यात!

googlenewsNext

चिखली (जि. बुलडाणा) : शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधांची हमी देणार्‍या ह्यराष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानह्ण अंतर्गत चिखली नगर पालिकेच्यावतीने १५ एप्रिल २0१५ पासून अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे; मात्र हे अभियान राबविण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाने औषधी व लसींचा पुरवठा अचानकपणे बंद केला आहे. पालिका व ग्रामीण रुग्णालयाच्या समन्वयाअभावी निर्माण झालेल्या गोंधळामुळे लहान बालके व गरोदर मातांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरी भागातील गरजू व दुर्लक्षित घटक आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नयेत यासाठी ह्यराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानह्ण (एनआरएचएम) आयुक्त मुंबई यांच्या सूचनेनुसार चिखली नगर पालिकेने ह्यराष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानह्ण (एनयूएचएम) अंतर्गत गत १५ एप्रिल २0१५ पासून रुग्णालय सुरू केले आहे. या रुग्णालयातमार्फत सदर अभियानाची अंमलबजावणी होत असून, दर सोमवारी शहरातील बालकांना लसीकरण तर गुरुवारी गरोदर मातांच्या तपासणीचा कार्यक्रम राबविण्यात येतो. याचा लाभ शहरातील सुमारे १५0 लहान बालके व ८0 गरोदर माता सद्यस्थितीत घेत आहेत. तर या लाभार्थी बालके व मातांना आवश्यक असलेली औषधी व लसी ग्रामीण रुग्णालयामार्फत पुरविण्यात येत होत्या; मात्र गत १0 ऑगस्टपासून ग्रामीण रुग्णालयाने हा पुरवठा अचानकपणे बंद केला आहे. दरम्यान, याबाबत पालिकेच्यावतीने ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे लसींच्या मागणीसाठी गेलेल्या कर्मचार्‍यांना वैद्यकीय अधीक्षकांनी स्पष्ट नकार देत ह्यआम्ही तुम्हाला यापुढे लस देणार नाही, परत या रुग्णालयात लसीकरणासंदर्भात येऊ नकाह्ण, असे बजावल्याने पालिकेच्या समुपदेशन सेवा सत्रासाठी लागणार्‍या लसीकरणाच्या साठय़ाअभावी या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीवर गंडांतर आले आहे.

Web Title: Pregnant mothers and children's health risks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.