बोंडअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:27 AM2021-05-30T04:27:22+5:302021-05-30T04:27:22+5:30
दहावीच्या निकालाकडे लक्ष बुलडाणा : दहावीच्या निकालावरून विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये ही अनेक संभ्रम आहेत. आता दहावीच्या विद्यार्थ्यांचे १०० गुणांचे मूल्यमापन ...
दहावीच्या निकालाकडे लक्ष
बुलडाणा : दहावीच्या निकालावरून विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये ही अनेक संभ्रम आहेत. आता दहावीच्या विद्यार्थ्यांचे १०० गुणांचे मूल्यमापन होणार आहे. त्यानंतर जून अखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने दहावीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे.
वाहन विक्री घटली
बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्गाचा मोठा परिणाम हा वाहन विक्रीवर झाला आहे. यामध्ये केवळ चार चाकी किंवा मोठी वाहनेच नाही, तर दुचाकीची विक्रीही घटली आहे. वाहन खरेदी विक्रीमध्ये मोठी घट अलीकडील काळात आलेली आहे.
पीक कर्जासाठी बँकाची नकार घंटा
बुलडाणा : आता प्रत्यक्ष खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक निकड वाढली असून, त्या दृष्टीने बँकांनी पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढविण्यावर जोर देण्याची गरज निर्माण झाली आहे. एकीकडे खरीप पीक कर्जासाठी बँका नकार घंटा वाजवत असल्याची ओरड होत आहे.
पाणीटंचाईमुळे घ्यावे लागते विकत पाणी
डोणगाव : ग्रामपंचायतने शासकीय नळ योजनेतून पाणीपुरवठा सुरू असूनही सध्या पाणी पुरत नसल्याचे दिसून येते. ३५ हजार लोकसंख्येच्या गावाला पाणीटंचाईमुळे अक्षरशः टँकरद्वारे विकत पाणी घ्यावे लागते.
वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
किनगाव राजा : वनविभागाने वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी ठिकठिकाणी पाणवठे तयार करण्यासह त्यामध्ये नियमित पाणी टाकले पाहिजे. सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.
आगीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मदतीची मागणी
जऊळका : गोठ्याला अचानक आग लागून ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी घडली होती. या आगीमध्ये शेतकरी जनार्दन सांगळे यांचे मोठे नुकसान झालेले आहे. ऐन खरीप हंगामाच्या पेरणीच्या तोंडावर शेती उपयोगी साहित्य तुषार सिंचनचे पाईप, सोयाबीन बियाणे, रासायनिक खतांच्या बॅगा जळून खाक झाल्या. त्यामुळे या शेतकऱ्याला आता पेरणीसाठी मोठी अडचणी निर्माण झाली आहे. आगीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यास मदत देण्याची मागणी परिसरतील शेतकऱ्यांनी केली आहे.
बुलडाणा तालुक्यात २० पॉझिटिव्ह
बुलडाणा : तालुक्यात दिवसाला १०० पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण आता अत्यंत कमी झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटल्याचे हे दिलासादायक चित्र आहे. शनिवारी तालुक्यात केवळ २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
ग्रामीण भागात एटीएमची गरज !
धामणगाव धाड : ग्रामीण भागातील जनतेचे आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यासाठी परिसरात नवीन एटीएम मशीन लावण्याची गरज आहे. याकडे बॅंक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. कोरोनामुळे बाहेरगावी जाता येत नाही.
विद्युत जोडणीची प्रतीक्षा
मेहकर : तालुक्यातील अनेक शेतकरी महावितरणच्या विद्युत जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतात विहीर असूनही विद्युत पुरवठा अभावी ते शेतीला पाणी देऊ शकत नसल्याने विद्युत जोडणी करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.