स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायत कार्यालय परिसरात अंत्यविधीची तयारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 11:07 AM2021-08-26T11:07:39+5:302021-08-26T11:07:58+5:30
Preparations for funeral at Gram Panchayat office : अंत्यसंस्कार कोठे करायचे, म्हणत ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत ईमारत परिसरात अंत्यविधीची तयारी केल्याने खळबळ उडाली आहे.
- सुभाष वाकोडे
लोकमत न्युज नेटवर्क
कनारखेड : कनारखेड गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून गुरूवारी एका वृध्देचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार कोठे करायचे, म्हणत ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत ईमारत परिसरात अंत्यविधीची तयारी केल्याने खळबळ उडाली आहे.
शेगाव तालुक्यातील कनारखेड गावात स्मशानभूमीसाठी जागाच नाही. गुरूवारी या गावातील चंद्रभागाबाई मारोती वाकोडे या महिोचा रात्री मृत्यु झाला.सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे गावालगतच्या शेतात पिक उभी आहे.त्यामुळे अंत्यविधीसाठी जागा नाही.गावाबाहेर शासनाची ई क्लासची किंवा शासनाची कुठलीही जमिन नाही.ग्रामस्थांनी वेळोवेळी गटविकास अधिकारी, तहसीलदार, जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी बुलडाणा, पालकमंत्री,आमदार, खासदार यांना निवेदन देवून स्मशानभूमीसाठी जागेची मागणी केली आहे. गायगाव बु,गायगाव खुर्द, व कनारखेड अशा तिन गावांची गट ग्रामपंचायत आहे. गायगाव गट ग्रामपंचायत ने सुध्दा स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन देण्याकरीता ठराव घेतला आहे.
गुरूवारी सकाळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या करमणूक केंद्र परिसरात लाकडे आणून अंत्यविधीसाठी तयारी सुरू केली.
बैलगाडीत लाकडे आणून करमणूक केंद्राचे परिसरात ग्रामस्थ ठाण मांडून बसले आहेत.
कनारखेड गावातील लोकांना अंतिम संस्कार कुठे करावा हा मोठा प्रश्न पडलेला आहे शासनाचा वारंवार गावकऱ्यांनी पाठपुरावा करूनही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची उपायोजना करण्यात आली नाही. त्यामुळे कणारखेड येथील रहिवाशांनी गावातील गायगाव गट ग्रामपंचायत च्या ईमारत परिसरातील कार्यरत असलेले करमणूक केंद्र परिसरात येऊन व अंतिम संस्कार च्या लाकड आणून आम्हाला जागा उपलब्ध करून द्या ग्रामपंचायत च्या परिसरातमध्ये आम्ही अंतिम संस्कार करू यासाठी ठाण मांडून येथील नागरिक शासनाविरोधात रोष व्यक्त करत आहेत.