शांती महोत्सवाची तयारी पूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2016 02:49 AM2016-10-15T02:49:55+5:302016-10-15T02:49:55+5:30
खामगाव येथे शनिवारी मातेची प्रतिष्ठापना
खामगाव, दि. १४- शतकाची परंपरा असलेल्या शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सवाची खामगावात तयारी पूर्ण झाली असून, शनिवारी जगदंबा मातेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानंतर सुमारे अकरा दिवस हा उत्सव चालणार आहे.
कोजागिरी पोर्णिमेपासून ११ दिवस चालणार्या या महोत्सवात विविध राज्यातून भाविक खामगाव येथे दाखल होतात. तब्बल १0८ वर्षांंंंंपासून या उत्सवाचे महत्त्व अबाधित असल्याने, खामगावातील अनेकांची अगाध श्रद्धा श्री मोठी देवीवर आहे. दरम्यान, या उत्सवाची संपूर्ण तयारी जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने करण्यात आली असून, मातेच्या मूर्तीची रंगरंगोटी पुर्णत्वास आली. जलालपुरा चौकात विद्युत रोषणाई आणि आकर्षक तोरण, पताका लावण्यात आल्या आहेत. पुर्णत्वास गेलेल्या जगदंबा छत्राचे लोकार्पण विदर्भ मीरा प.पू. अलकाश्री यांच्याहस्ते शनिवारी करण्यात येणार आहे.
जगदंबा छत्रामुळे वाढली महोत्सवाची रौनक!
मोठी देवीच्या उत्सवानिमित्त यावर्षी मोठी देवी चौकात जगदंबा छत्र उभारण्यात आले आहे. या छत्रावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यामुळे जगदंबा छत्र भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे.
असे आहे उत्सवाचे स्वरूप!
शनिवार, १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जगदंबा मातेची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. शनिवार २२ ऑक्टोबर रोजी १२ ते ४ वाजेपयर्ंत महाप्रसादाचे आयोजन, रविवार २३ ऑक्टोबर रोजी सत्यनारायण पूजा व प्रसाद वितरण केल्या जाईल. त्यानंतर सोमवार २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास आरती होऊन मातेची शोभायात्रा गावातील प्रमुख मार्गाने निघून घाटपुरी येथे मातेचे विर्सजन केल्या जाईल.