तिसरी लाट रोखण्यासाठी पूर्वतयारी, ३५० बेड वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:33 AM2021-05-16T04:33:43+5:302021-05-16T04:33:43+5:30
--ऑक्सिजन बेड-- जिल्ह्यात सध्या १,५४३ ऑक्सिजन बेड उपलब्ध असून त्यात आणखी वाढ करण्यात येत आहे. बुलडाणा येथील कोविड समर्पित ...
--ऑक्सिजन बेड--
जिल्ह्यात सध्या १,५४३ ऑक्सिजन बेड उपलब्ध असून त्यात आणखी वाढ करण्यात येत आहे. बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयात २० बेड वाढविण्यात आले असून, आणखी एक कक्षही कोविड रुग्णांसाठी उभारण्यात आला आहे. शेगाव, मलकापूर, नांदुरा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, खामगाव येथेही बेड ऑक्सिजन बेड वाढविण्यात येत आहेत.
--ऑक्सिजन--
बुलडाणा येथील ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे बुलडाणा येथे दोन प्लांट कार्यान्वित झाले आहेत. यासोबतच देऊळगाव राजा, खामगाव, मलकापूर आणि जळगाव जामोद येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त आणखी दोन ऑक्सिजन जनरेशन प्लांट बुलडाणा जिल्ह्यास मिळणार आहेत.
--कोविड केअर सेंटर--
जिल्ह्यातील जवळपास ३२ कोविड केअरचे सेंटरमधील बेडची क्षमता वाढविण्यात येत आहे. काही ठिकाणी ऑक्सिजन बेडही उपलब्ध करण्याची तयारी सुरू आहे. हिवरा आश्रम येथे ५०, नांदुरा येथे ५०, बुलडाणा येथे १००, सि. राजा व देऊळगाव राजा येथेही प्रत्येकी ५० बेड वाढविण्यात येत आहेत.
--अैाषधी--
जिल्ह्यात वर्तमान स्थितीत कोविड संदर्भाने आवश्यक असलेली अैाषधी उपलब्ध आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचाही पुरवठा शासकीय रुग्णालयांमध्ये सुरळीत असून खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये होणारा संभाव्य काळाबाजार पाहता आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत जिल्ह्यातील रुग्णालयांना रुग्णसंख्या विचारात घेऊन न्याय पद्धतीने रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण करण्यात येत आहे.
--कोठे किती बेड वाढविण्याची तयारी--
शेगाव-५०
मलकापूर-२५
हिवरा आश्रम- ५०
नांदुरा-५०
बुलडाणा-१००
देऊळगाव राजा- ५०
सि. राजा-५०
--कोट--
तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता विचारात घेता आरोग्य विभाग बेड वाढविण्यासोबतच, ७ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारणी, अैाषधीसाठा तसेच अतिरिक्त ऑक्सिजन बेड वाढविण्यावर भर देत आहे. तूर्तास ३५० बेडचे प्राथमिक स्वरुपात नियोजन करण्यात आले असून येत्या काळात त्यात आणखी वाढ करण्याचे प्रयोजन आहे.
(प्रशांत पाटील, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा)