रब्बी हंगामाची तयारी सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:51 PM2017-10-22T23:51:14+5:302017-10-22T23:51:45+5:30
खामगाव : दिवाळी आटोपताच शेतकर्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरु केली असून शेतमशागतीची कामे जोमात सुरु झाल्याचे दिसून येते. खरीप हंगामात पावसाने दगा दिला. त्यातच शेतमालाला योग्य भाव सुध्दा मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या पदरी निराशाच पडली होती. आता येणार्या रब्बी हंगामातून तरी चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकर्यांना वाटत आहे.

यावर्षीचा खरीप हंगाम शेतकर्यांसाठी प्रचंड निराशाजनक ठरला. ना पावसाची साथ मिळाली ना शेतमालाला योग्य भाव. सुरुवातीला आवश्यकता असतानाच्या काळात पाठ फिरवणार्या पावसाने नंतर मात्र अवेळी हजेरी लावल्याने शेतमालाचे नुकसान झाले.
त्यामुळे मालाचा दर्जा घसरला व नॉन एफएक्यू च्या नावाखाली कमी भावाने त्याची खरेदी करण्यात आली. परिणामी शेतकर्यांसाठी हा हंगाम नुकसानकारक ठरला. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी सुध्दा हंगाम सरल्यावर पदरात पडली. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या शेतकरी पुरता खचलेला असताना रब्बी हंगामात उत्पन्न मिळविण्याची आशा त्याच्या मनात निर्माण झालेली आहे.
याकरिता शेतकरी शेतमशागतीच्या कामाला भिडला असून ऐन दिवाळीच्या दिवसातही ही कामे करताना शेतकरी दिसून आला. गहू, हरबरा आदी रब्बीची पिके घेण्याची तयारी शेतकर्यांनी चालविली असून भाजीपाला पेरण्याचे नियोजन सुध्दा केले जात आहे. याकरिता ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागतीची कामे केली जात आहेत.