स्वच्छतेपासून शाळा निर्जंतुकीकणाची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:31 AM2021-01-18T04:31:14+5:302021-01-18T04:31:14+5:30

नववी ते बारावीची ३० टक्के उपस्थिती २३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात नववी ...

Preparations for school disinfection begin with hygiene | स्वच्छतेपासून शाळा निर्जंतुकीकणाची तयारी सुरू

स्वच्छतेपासून शाळा निर्जंतुकीकणाची तयारी सुरू

Next

नववी ते बारावीची ३० टक्के उपस्थिती

२३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात नववी ते बारावीच्या ६६१ शाळा असून, त्यामध्ये १ लाख १६ हजार ५३४ विद्यार्थी आहेत. सुरुवातीला ४२३ शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. पहिल्या दिवशी ६ हजार ४३८ विद्यार्थ्यांचीच उपस्थिती होती. सध्या नववी ते बारावीच्या ८५ टक्के शाळा सुरू असून, त्यामध्ये ३४ हजार २२५ म्हणजे ३० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून येत आहे.

पालकांना काय वाटते.

शाळा सुरू व्हाव्यात अशी, पालकांना अपेक्षा आहे. परंतु कोरोनाची भीती अद्याप संपलेली नाही. त्यामुळे शाळांमध्ये सॅनिटायझेशन व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.

ज्ञानेश्वर पवार, पालक.

ऑनलाईन शिक्षण व्यवस्थित सुरू होते. शाळांमध्ये कमी विद्यार्थ्यांना बोलावून त्यांची परीक्षा घेतली असती, तरी चालले असते. कोराेनापासून काळजी घेणे गरजेचे आहे.

संजय देशमुख, पालक.

शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता करण्यात येत आहे. शाळा सुरू करण्याबाबत अद्याप आदेश प्राप्त झालेले नाहीत. शिक्षण विभागाने दिलेल्या सूचंनाचे पालन करून त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येईल.

सचिन जगताप, प्रभारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या

पाचवी ४६७४३

सहावी ४६६१२

सातवी ४६५९०

आठवी ४५१०५

Web Title: Preparations for school disinfection begin with hygiene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.