गणपती उत्सवासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 07:05 PM2017-08-24T19:05:04+5:302017-08-24T19:05:07+5:30

सिंदखेडराजा : शहरासह ग्रामीण भागातील गणपती बाप्पाची स्थापना २५ आॅगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे गणपती उत्सवादरम्यान शांतता राखण्याकरिता तसेच विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी अधिकाºयांनी २२ आॅगस्ट रोजी केली. यावेळी तहसिलदार संतोष कणसे, पोलिस निरिक्षक बळीराम गिते, नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी धनश्री शिंदे, महावितरणचे सहाय्यक अभियंता गवळी, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक सुनिल खेडेकर व पोलिस काँस्टेबल सचिन मुदमाळी यांनी संयुक्तरित्या पाहणी केली. 

Prepare the administration for the Ganpati festival | गणपती उत्सवासाठी प्रशासन सज्ज

गणपती उत्सवासाठी प्रशासन सज्ज

Next
ठळक मुद्देअधिका-यांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : शहरासह ग्रामीण भागातील गणपती बाप्पाची स्थापना २५ आॅगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे गणपती उत्सवादरम्यान शांतता राखण्याकरिता तसेच विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी अधिकाºयांनी २२ आॅगस्ट रोजी केली. यावेळी तहसिलदार संतोष कणसे, पोलिस निरिक्षक बळीराम गिते, नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी धनश्री शिंदे, महावितरणचे सहाय्यक अभियंता गवळी, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक सुनिल खेडेकर व पोलिस काँस्टेबल सचिन मुदमाळी यांनी संयुक्तरित्या पाहणी केली. 
या मार्गावर बांधकाम सुरु असलेल्या विटा, रेती, दगड, गिट्टी उचलण्याच्या सूचना दिल्या. गणपती बाप्पाची स्थापना २५ आॅगस्ट रोजी सर्वत्र होणार असून, गणपती विसर्जन सिंदखेडराजा येथे ४ सप्टेबर रोजी अकराव्या दिवशी होणार आहे. तर ग्रामीण भागातील गणपती विसर्जन ५ सप्टेंबरला अनंत चतुर्थीला होणार आहे. या उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे असले तर ते निवारण्यासाठी संबंधित अधिकाºयांनी मार्गाची पाहणी केली व नागरिकांनी मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सहकार्य करण्याचे सांगितले. तसेच गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील विद्युत लाईनच्या लोंबकळत असलेल्या तारा, रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्यावर बांधकामाचे पडलेले साहित्य, गिट्टी, रेती, विटा संबंधितांनी उचलून घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. 

Web Title: Prepare the administration for the Ganpati festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.