गणपती उत्सवासाठी पोलिसांसह प्रशासन सज्ज! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:22 PM2017-08-24T23:22:12+5:302017-08-24T23:23:53+5:30

बुलडाणा: सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या o्री गणेशाचे शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी आगमन होत आहे. गणपती उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, गणपतीच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत या उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.  

Prepare the administration with the police for the Ganapati festival! | गणपती उत्सवासाठी पोलिसांसह प्रशासन सज्ज! 

गणपती उत्सवासाठी पोलिसांसह प्रशासन सज्ज! 

Next
ठळक मुद्देअधिकार्‍यांनी मिरवणूक मार्गाची केली पाहणीसिंदखेड राजा शहरात अधिकार्‍यांनी केली पाहणी 

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या o्री गणेशाचे शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी आगमन होत आहे. गणपती उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, गणपतीच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत या उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.  
  बुलडाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव, नगरपालिकेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी गणपती विसर्जन स्थळाची पाहणी केली. गणपतीचे विसर्जन करण्यात येणार्‍या तलावांचीही पाहणी केली. 

सिंदखेड राजा शहरात अधिकार्‍यांनी केली पाहणी 
शहरासह ग्रामीण भागातील गणपती बाप्पाची स्थापना २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे गणपती उत्सवादरम्यान शांतता राखण्याकरिता तसेच विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी अधिकार्‍यांनी २२ ऑगस्ट रोजी केली. यावेळी तहसीलदार संतोष कणसे, पोलीस निरीक्षक बळीराम गीते, नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी धनश्री शिंदे, महावितरणचे सहायक अभियंता गवळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील खेडेकर व पोलीस काँस्टेबल सचिन मुदमाळी यांनी संयुक्तरीत्या पाहणी केली. या मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या विटा, रेती, दगड, गिट्टी उचलण्याच्या सूचना दिल्या. गणपती बाप्पाची स्थापना २५ ऑगस्ट रोजी सर्वत्र होणार असून, गणपती विसर्जन सिंदखेडराजा येथे ४ सप्टेबर रोजी अकराव्या दिवशी होणार आहे. तर ग्रामीण भागातील गणपती विसर्जन ५ सप्टेंबरला अनंत चतुर्थीला होणार आहे. या उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे असले तर ते निवारण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी मार्गाची पाहणी केली व नागरिकांनी मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सहकार्य करण्याचे सांगितले. तसेच गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील विद्युत लाइनच्या लोंबकळत असलेल्या तारा, रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्यावर बांधकामाचे पडलेले साहित्य, गिट्टी, रेती, विटा संबंधितांनी उचलून घेण्याच्या सूचना दिल्या.  

Web Title: Prepare the administration with the police for the Ganapati festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.