जिल्ह्याचा २७५० कोटींचा वार्षिक आराखडा तयार
By Admin | Published: March 31, 2017 08:06 PM2017-03-31T20:06:52+5:302017-03-31T20:16:19+5:30
बुलडाणा: जिल्ह्याचा २०१७- १८ वर्षाकरिताचा २७५० कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये पिककजार्साठी १४५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
बुलडाणा: जिल्ह्याचा २०१७- १८ वर्षाकरिताचा २७५० कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये पिककजार्साठी १४५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून, जिल्हाधिकारी विजय झाडे यांच्या हस्ते शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आराखड्याचे विमोचन करण्यात आले.
बुलडाणा जिल्ह्याचा २०१७ - १८ चा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला असून, यामध्ये १४५० कोटी रूपयांची अधिकाधिक रक्कम पिककजार्साठी देण्यात आली आहे. यातील १३५६ कोटी खरीप तर १०२ कोटी रूपयांची तरतूद रब्बी पिककजार्साठी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या पिककर्ज घेण्याकरिता पात्र शेतकरी १ लाख ३६ हजार आहेत. तसेच प्रधानमंत्री पिकविमा योजनेतील बिगर कर्जदार नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या १ लाख ७९ हजार आहे. १ एप्रिल २०१७ रोजी ६३ हजार ५२९ शेतकरी पिककजार्साठी पात्र ठरणार असून, १ जुलै २०१७ रोजी ६८ हजार ०४ शेतकरी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्याकरिता ३१ जूनपूर्वी पिककजार्ची रक्कम घेण्याची गरज आहे. यासोबतच दीर्घ मुदत, मध्यम मुदत शेती कजार्साठी ३३५ कोटी, सुक्ष्म- मध्यम व लघू व्यावसायिकांसाठी २०१ कोटी, शैक्षणिक कजार्साठी २०.१६ कोटी, गृह कजार्साठी प्रधानमंत्री आवास योजना विशेष प्राधान्याकरिता २६८.७८ कोटी व अन्य बाबींसाठी ४६५.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अन्य बाबींमध्ये जिल्हा उद्योग केंद्र २९ कोटी तसेच महिला बचतगटांसाठी २९ कोटींची तरतूद
करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्याचा २०१७ - १८ चा वार्षिक पतपुरवठा आराखडा पुस्तस्तिकेचे विमोचन करताना दुय्यम निबंधक पालोदकर, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक पी. एन. श्रोते, जिल्हा बँकेचे सीईओ अशोक खरात, जिल्हा विकास प्रबंधक सुभाष बोंदाडे, स्टेट बँक आॅफ इंडियाचे राजेश परब, ग्रामीण बँकेचे टी. एफ. वानखडे, जिल्हा उद्योग केंद्राच्या सोनाली देवरे, बँक आॅफ महाराष्ट्रचे प्रवीण कुरमे, ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे संचालन प्रणय सावजी यांची उपस्थिती होती.