बुलडाणा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 12:12 PM2020-06-02T12:12:49+5:302020-06-02T12:12:59+5:30
मेहकर, सिंदखेड राजा, लोणार, बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा या तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.
बुलडाणा : जिल्ह्यात रविवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. खरीप हंगाम अवघ्या सहा दिवसावर आला आहे. जिल्ह्यात सात लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन असून शेतकऱ्यांची पेरणी पूर्व कामे करण्याची लगबग सुरू झाली आहे.
जिल्ह्यात ३१ मे रोजी सायंकाळच्या ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मेहकर तालुक्यात सायंकाळी पाचे वाजेदनरम्यान पावसाला सुरूवात झाली. वादळी वाºयासह झालेल्या पावसाने घाटावरील तालुक्यांमधील ग्रामीण भागात नागरिकांची तारांबळ उडाली. सिंदखेडराजा व मेहकर तालुक्यात सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले व काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी टिनपत्रे उडाली असून केळी व अन्य फळबागांचेही नुकसान झाले आहे. मेहकर, सिंदखेड राजा, लोणार, बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा या तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यात खरीप हंगामाचे नियोजन पूर्ण झालेले आहे. खरीप हंगामापूर्वीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत. ढगाळ वातावरणामुळे शेतकºयांनी सोमवारी दिवसभर शेतातील कामे केली.