बुलडाणा परिसरात पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:23 AM2021-07-20T04:23:48+5:302021-07-20T04:23:48+5:30

आधार केंद्र बंद असल्याने नागरिकांची पायपीट बुलडाणा: शासनाने प्रत्येक योजनांचा लाभ घेण्याकरिता आधार कार्ड सक्तीचे केले. मात्र, अनेक ...

Presence of rain in Buldana area | बुलडाणा परिसरात पावसाची हजेरी

बुलडाणा परिसरात पावसाची हजेरी

Next

आधार केंद्र बंद असल्याने नागरिकांची पायपीट

बुलडाणा: शासनाने प्रत्येक योजनांचा लाभ घेण्याकरिता आधार कार्ड सक्तीचे केले. मात्र, अनेक ठिकाणचे आधार केंद्रच असल्यामुळे नागरिकांची पायपीट होत आहे. ग्रामीण भागातील आधार केंद्र शहरात थाटण्यात आलेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अडचणी येतात.

धोकादायक इमारतींचे काय?

बुलडाणा: जिल्ह्यात अनेक शिकस्त आणि धोकादायक इमारती उभ्या असतानाही काही पालिका प्रशासनाकडून सर्व्हेच झाला नसल्याचे वास्तव आहे. धोकादायक इमारतींमुळे वाढणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विद्यार्थ्यांचा चिखल तुडवत प्रवास

लोणार : आता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत, परंतू अनेक गावांत आतापर्यंत बस पोहोचली नसल्याचे वास्तव आहे. यामुळे या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात तर विद्यार्थ्यांसह सर्वांनाच चिखल तुडवत पायी प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जलसाठ्यात होतेय वाढ

बुलडाणा: पुढील काळातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रकल्पांमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा निर्माण होणे गरजेचे आहे. केवळ उन्हाळ्याचा विचार करता बुलडाणा जिल्ह्यातील शहरी तथा ग्रामीण भागासाठी जवळपास ४० दलघमी पाण्याची गरज भासते. त्याची किमान या पावसाळ्यात तरतूद होण्याची गरज आहे.

Web Title: Presence of rain in Buldana area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.