पावसाची सर्वदूर हजेरी!
By admin | Published: September 29, 2016 01:39 AM2016-09-29T01:39:04+5:302016-09-29T01:39:04+5:30
मोताळा तालुक्यात २७ सप्टेंबरपर्यंंत ५८१ मि.मी. पाऊस झाला आहे.
मोताळा(जि. बुलडाणा), दि. २८- शहरासह तालुक्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली असून, दोन दिवसात ५८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात २७ स प्टेंबरपर्यंंत ५८१ मि.मी. पाऊस झाला आहे. पावसामुळे नळगंगा व पलढग या प्रकल्पातील पाणी पातळीत तीन टक्क्यांनी वाढ झाली असून, परतीच्या पावसामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या १ ऑगस्टपासून पाठ फिरविलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री मोताळय़ासह परिसरातील मंडळामध्ये चांगल्याप्रकरे हजेरी लावली. कुठे रिपरिप, कुठे हलका तर मोताळा, िपंपळगाव देवी, बोराखेडी, रोहिनखेड, धामणगाव बढे, पिंप्रीगवळी या ठिकाणी दमदार पडलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. परतीच्या पावसामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला असून, शेतकरी वर्ग सुखावला आहे. तालुक्यात आतापर्यंंत (२४ सप्टेंबर २0१६) ५८१ मि.मी. पाऊस झाला असून, तालुक्याची दरोमदार असलेल्या नळगंगा प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत मागील दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज रोजी नळगंगा प्रकल्पाची पाणीपातळी २४.९१ टक्के असून, पलढग या लघू प्रकल्पाची टक्केवारी ८४.८२ इतकी वाढली आहे. मागील २५ दिवसांपासून दडी मारणार्या पावसाने गत दोन दिवसात तालुक्यात पुन्हा हजेरी लावली.मध्यम स्वरूपाच्या तर काही ठिकाणी दमदार स्वरूपात पावसाने हजेरी लावल्याने पेरणी करण्यात आलेल्या कापूस, मका, ज्वारी, बाजरी, तूर यासह कडधान्य िपकांना काही प्रमाणात फायदा झाला आहे.