बुलडाणा तालुक्यात पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:01+5:302021-05-29T04:26:01+5:30

लोणार तालुक्यात आठ पॉझिटिव्ह लोणार : तालुक्यात दिवसाला ५० पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण आता अत्यंत कमी झाले ...

Presence of rains in Buldana taluka | बुलडाणा तालुक्यात पावसाची हजेरी

बुलडाणा तालुक्यात पावसाची हजेरी

Next

लोणार तालुक्यात आठ पॉझिटिव्ह

लोणार : तालुक्यात दिवसाला ५० पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण आता अत्यंत कमी झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटल्याचे हे दिलासादायक चित्र आहे. शुक्रवारी तालुक्यात केवळ आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

गुरांचे लसीकरण लांबले

दुसरबीड: परिसरात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गुरांचे लसीकरण करण्यात येते. काही महिन्यांपूर्वी अनेक गावांतील गुरांना लम्पीची लागण झाल्याने पशुपालक त्रस्त झाले होते. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विशेष अभियान राबवून लसीकरण करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी गुरांना लसीकरण करणे आवश्यक असतानाही यंदा लसीकरणास विलंब झाला.

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था!

बीबी: ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा अपघात हाेत असल्याचे चित्र परिसरात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

व्हायरल फिव्हरची साथ; ग्रामस्थ त्रस्त

सुलतानपूर : परिसरात वातावरणातील बदलामुळे व्हायरल फिव्हरची साथ सुरू आहे. अनेकांना सर्दी, ताप, खाेकल्याचा त्रास हाेत आहे. काेराेनाची हीच लक्षणे असल्याने, ग्रामस्थांनी धास्ती घेतल्याचे चित्र सुलतानपूर परिसरातील अनेक गावांमध्ये आहे.

वीजपुरवठा खंडित; नागरिक त्रस्त

बुलडाणा : सागवन, सुंदरखेड परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित हाेत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन वीजपुरवठा करण्याची मागणी होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने, विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर घरात बसणेही अवघड होते.

विजेच्या खांबांना दिव्यांची प्रतीक्षा

मेहकर: परिसरातील काही ठिकाणी विजेच्या खांबावर गत काही दिवसांपासून दिवेच लावण्यात आले नाही. त्यामुळे अनेक भागांत रात्रीला अंधार राहतो. विद्युत पथदिव्यांअभावी चोरीच्या घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन वस्तीमध्ये तर विद्युत पोलचा अभावही दिसून येतो.

पाणी तपासणीच नाही

बुलडाणा: विनापरवानगी सुरू असलेल्या बहुतांश आरओ प्लांटच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणीच हाेत नसल्याचे चित्र आहे. पाणी तपासणारी यंत्रणाच नसल्याने, तसेच नगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासन या आरओ प्लांटकडे दुर्लक्ष करीत असल्याने, नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. शहरात ११ माेठे प्लांट असून, १४० लीटर पाण्याची विक्री हाेते. दरराेज तीन हजार रुपयांचा व्यवसाय हाेताे.

ग्रामीण भागात इंटरनेट सेवा ठप्प

डोणगाव : गत काही दिवसांपासून डोणगाव परिसरात इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे शासकीय कामकाजासह इतर कामे ठप्प हाेत आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

वार्षिक परताव्याला ऑनलाइनचे बंधन

बुलडाणा : जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिक जे विविध अन्नपदार्थांचे उत्पादन पॅकिंग, रिपॅकिंग करतात, अशा सर्वांना अन्नसुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत सादर करावयाचे वार्षिक विवरणपत्र फार्म डी-१ हे यापूर्वी कार्यालयात सादर केले जायचे, तथापि अन्नसुरक्षा व मानदे प्राधिकरण नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार ते ऑनलाइन सादर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

कडक निर्बंधांमुळे आंबे विक्रीत घट

मेहकर : येथे ग्रामीण भागातून आंबे मोठ्या प्रमाणात विक्रीकरिता येतात. लाॅकडाऊन व कडक निर्बंध असल्याने आंबे विक्रीमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दारोदार आंबे विक्री केली जात आहे, परंतु कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीने ग्राहक मिळत नाहीत. मेहकर शहरात एका ठिकाणी रस्त्याच्या बाजूला एक महिला आंबे विक्री करत आहे, परंतु त्या ठिकाणी ग्राहक येत नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Presence of rains in Buldana taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.