भाव पडले: शेतकऱ्यांनी काशीफळ चक्क उकीरड्यावर फेकून दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:32 PM2018-10-03T12:32:12+5:302018-10-03T12:33:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : महाप्रसादात भाजीचा मान असलेल्या काशीफळाचे (कोहळे) दर कमालिचे घटले आहेत. काशीफळाची वाहतूकही शेतकºयांना परवडणारी नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकलेले काशीफळ चक्क उकीरड्यावर टाकून दिलेत.
धार्मिक सण-उत्सवात काशीफळाला अनन्यसाधारण महत्व आहे. गौरी-गणपती आणि नवरात्रोत्सवात केल्या जाणाºया महाप्रसादात प्रामुख्याने काशीफळाच्याच भाजीला महत्व दिले जाते. भाजीसोबतच खीर आणि इतरही पदार्थ या फळापासून तयार केले जातात. धार्मिक सणासुदीच्या काळात या फळाला मोठी मागणीही असते. मात्र, यावर्षी भाजीबाजारात काशीफळाच्या भावात कमालिची घट झाली आहे. शेतातून भाजीबाजारात काशीफळ वाहून नेण्याचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. बाजारापेठेत विक्रीसाठी आणलेल्या काशीफळाला योग्य भाव मिळाला नाही, म्हणून काही शेतकऱ्यांनी चक्क हे काशीफळ उकीरड्यावर फेकून दिलेत.
बाजारपेठेत पडेल भावाने खरेदी!
शेतकºयाने उत्पादीत केलेल्या मालाची व्यापाºयांकडून पडेल भावाने खरेदी केली जाते. मालाची आवक जास्त झाली की भाव पाडले जातात. त्यामुळे संतापातून शेतकरी रस्त्याच्या कडेला अथवा नाल्यात विक्रीसाठी आणलेला शेतमाल फेकून देत असल्याचे दिसून येते.
काशीफळाच्या उत्पादनातून दोन पैसे मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, भाजीबाजारात काशीफळाचे भाव कमालिचे कोसळले आहेत. वाहतूक खर्चही निघेनासा झाल्याने दीड क्वींटल शेतमाल उकीरड्यावर टाकून दिला.
- उदय साबळे, शेतकरी, खामगाव.
/>