भाजीपाल्याला मातीमोल भाव, फळ बाजारात तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:30 AM2021-02-15T04:30:35+5:302021-02-15T04:30:35+5:30

कोबी, मेथीला मिळेना भाव सध्या कोबी केवळ पाच रुपये किलो विक्री होत आहे. वांगे १० ते २० रुपये किलो, ...

Prices of vegetables and fruits in the market | भाजीपाल्याला मातीमोल भाव, फळ बाजारात तेजी

भाजीपाल्याला मातीमोल भाव, फळ बाजारात तेजी

Next

कोबी, मेथीला मिळेना भाव

सध्या कोबी केवळ पाच रुपये किलो विक्री होत आहे. वांगे १० ते २० रुपये किलो, मेथी १५ रुपये किलो, गाजर २० रुपये किलो, अद्रक १५ रुपये किलो, टोमॅटो १० रुपये किलो, मिरची ३० रुपये किलो विकले जात आहेत.

फळ बाजारातील आवक स्थिर

या आठवड्यात फळ बाजारातील आवक स्थिर आहे. फळ बाजारात फळांचे भाव वाढलेले आहेत. सफरचंद २०० रुपये किलो, संत्री ५० रुपये किलो, चिकू ४० रुपये किलो, द्राक्ष ६० ते ७० रुपये किलो, केळी २० रुपये डझन, टरबूज १० रुपये, खरबूज २० रुपये किलो, तर पपई १० रुपये किलो दराने मिळत आहे.

कोट..

भाजीपाल्याचे भाव कमी झाल्याने शेतकरी व किरकोळ विक्रेत्यावर संकटच आहे. मजुरी कशी काढावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

-गणेश वाघमारे, भाजीपाला विक्रेता

कोट..

७०० रुपयांचा भाजीपाला विकत घेतला; पण दुपारी २ वाजेपर्यंत केवळ ५० रुपये आले. भाजीपाल्याचे दर घसरल्याने मजुरी निघणेही कठीण झाले आहे.

-रमेश पांडव, भाजीपाला विक्रेता, डोणगाव

कोट..

भाजीपाला वगळता इतर किराणा व फळांचे भाव गगनाला भिडले आहेत. या वाढत्या महागाईने बजेट कोलमडले आहे.

-देवा पाटील, ग्राहक

Web Title: Prices of vegetables and fruits in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.