आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व सिध्द करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान : राहुल बोंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:33 AM2021-04-06T04:33:47+5:302021-04-06T04:33:47+5:30

स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयद्वारा आयोजित 'अनुबंध २०२१' या माजी विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय ऑनलाइन मेळाव्याच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या मेळाव्याला ...

Pride of students who have proved their mettle at the international level: Rahul Bondre | आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व सिध्द करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान : राहुल बोंद्रे

आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व सिध्द करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान : राहुल बोंद्रे

Next

स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयद्वारा आयोजित 'अनुबंध २०२१' या माजी विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय ऑनलाइन मेळाव्याच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या मेळाव्याला संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.व्ही.आर. यादव, विश्वस्त सिध्देश्वर वानेरे, प्राचार्य डॉ. अरुण नन्हई, तत्कालीन प्रा. डॉ.एम.यू. खरात, डॉ. जि.यु. खरात, डॉ.एस.एस. देशमुख, डॉ.एस.बी. वानखडे, डॉ.एस.जी. काळपांडे, डॉ.पी.पी. वानखेडे, डॉ.ए.एम. जिंतूरकर माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या अध्यक्षा प्रा.सरिता सावळे, सचिव मनीष कुळकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.अरुण नन्हई यांनी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची उत्तुग भरारी ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे स्पष्ट करून गत २५ वर्षांतील महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख सादर केला. या मेळाव्यात योगेश खंडार व्हाईस प्रेसिडेंट सिटी बँक अमेरिका, सागर भावे सीईओ ओएसएचएचसी डॉट कॉम अमेरिका, ओम निकम फ्लेक्सीपाईप इंजिनिअरींग सोल्युशन लि. इंग्लड, रूपेश कुमार महातो एम.डी. कासाडेरा प्रा.लि. नेपाळ, आशीष मुळे सोल्युशन डायरेक्टर एचसीएल टेक्नॉलॉजी लि. इंग्लड, मेघना खान संस्थापक एम.के. काैन्सिलिंग सर्विसेस दुबई, प्रभाकर सिंग असिटंट डायरेक्टर युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्व्हिया, अमोल पुजे मॅनेजर कॅपजेमिनी अमेरिका, अक्षय रुद्राक्ष सिनिअर मॅनेजर सीसीसी इन्फॉर्मेशन सर्विसेस अमेरिका, चंद्रकांत बोठे सह संथापक फोवियाटेक लि., अपर्णा खिरोडकर सॉफ्टवेअर इंजिनिअर अ‍ॅसुरंन्ट लि. अमेरिका, दिनक सहेगल प्रोजेक्ट मॅनेजर एमएएचएलई लि. जर्मनी, अनंत समदानी सिनिअर रीसर्च सायंटिस्ट स्क्ल्मर्बगर इंग्लंड या माजी विद्यार्थ्यांनी सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना उद्योग जगताच्या अभियंताकडून काय अपेक्षा आहेत. त्यानुषंगाने कोणते विशिष्ट कोर्सेस केले पाहिजे, याबद्दल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. किशोर वळसे यांनी केले.

आजी-माजी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद !

महाविद्यालयात दरवर्षी देशविदेशात कार्यरत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा 'अनुबंध' या उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात येतो. यंदा कोरोनामुळे हा मेळावा ऑनलाइन पध्दतीने पार पडला. यास आजी-माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Web Title: Pride of students who have proved their mettle at the international level: Rahul Bondre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.