पंतप्रधान आवास योजनेचा तिढा सुटणार; सर्वेक्षणास होणार प्रारंभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:51 PM2017-12-06T23:51:47+5:302017-12-06T23:52:01+5:30
शहरातील गरीब आणि वंचितांचे घरकुलांचे स्वप्नं साकार करण्याचा मुख्य उद्देश असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा तिढा लवकरच सुटणार असल्याचे संकेत आहे. सन २0२२ पर्यंत ३५१९ घरकुलांचे टप्प्या-टप्प्याने उद्दीष्ट असलेल्या आवास योजनेच्या सर्वेक्षणास येत्या आठवड्यात प्रारंभ करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातील गरीब आणि वंचितांचे घरकुलांचे स्वप्नं साकार करण्याचा मुख्य उद्देश असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा तिढा लवकरच सुटणार असल्याचे संकेत आहे. सन २0२२ पर्यंत ३५१९ घरकुलांचे टप्प्या-टप्प्याने उद्दीष्ट असलेल्या आवास योजनेच्या सर्वेक्षणास येत्या आठवड्यात प्रारंभ करण्यात येणार आहे.
‘सर्वांसाठी घरे’ हे ब्रिद असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ २५ जून २0१५ रोजी करण्यात आला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशातील १00 शहरांमध्ये घरकुल बांधकामास सुरूवात करण्यात आली. आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या लाभार्थ्यांसाठी चार भागांची वेगळी योजना असे या योजनेचे खास वैशिष्टे असून खामगाव शहरात २0१७- २0२२ पर्यंत ३५१९ घरकुलांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीकोनातून पालिका प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये सन २0१७-१८ या आर्थिक वर्षांसाठी ३५८ घरकुलांचे उद्दीष्ट ठरविण्यात आले असून टप्प्या-टप्प्याने २0२२ पर्यंत साडेतिन हजारावर घरकुलांची निर्मिती केली जाईल. दरम्यान, या योजनेला गती देण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. घरकुल बांधकामासाठी मुंबई येथील एका संस्थेची प्रकल्प विकास आणि व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
घरकुल निर्मितीचा कंत्राट मुंबईत !
खामगाव शहरातील पंतप्रधान आवास योजनेतंर्गत प्रस्तावित घरकुल बांधकामाचा कंत्राट मुंबई येथील संस्थेस देण्यात आला आहे. मुंबई येथील देवधर असोसिएटस् तर्फे डॉ. सुषमा देवधर, मुंबई यांची निविदा मंजूर करण्यात आहे. प्रकल्प विकास आणि व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, या संस्थेची पत्रव्यवहारही पूर्णत्वास आला आहे. परिणामी, शहरातील घरकुल योजनेचा तिढा सुटला असून, येत्या आठवड्यात सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
नागरिकांच्या पालिकेत चकरा !
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी शहरातील गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांनी पालिकेत चकरा सुरू केल्या आहेत. वस्तुस्थितीत पालिकेच्यावतीने सर्वेक्षण केल्यानंतर प्रत्यक्षात लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्वेक्षणास आलेल्या पथकाला योग्य ती माहिती देणे अपेक्षीत असल्याचे पालिका सुत्रांचे म्हणणे आहे.
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल निर्मितीसाठी मुंबई येथील एका संस्थेची प्रकल्प विकास आणि व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये शहरात योजनेतंर्गत सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात येईल.
- धनजंय बोरीकर
मुख्याधिकारी, खामगाव.