प्रधान सचिव घेणार शेगावात ‘पुरवठय़ाची’ कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:38 PM2017-10-22T23:38:41+5:302017-10-22T23:39:43+5:30
बुलडाणा: गेल्या काही काळापासून रेशनच्या धान्याचा वाढता काळाबाजार रोखण्यासोबतच बुलडाणा जिल्हय़ातील स्वस्त धान्य वितरण यंत्रणेला व्यवस्थेमध्ये झालेल्या बदलाबाबत सूचित करण्यासोबतच ई-पॉज मशीन फ्रेंडली हाताळण्याबाबतचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण शेगाव येथे २६ ऑक्टोबर रोजी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यशाळेसाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक हे स्वत: हजर राहून जिल्हय़ातील एकंदरीत स्थितीचा आढावा घेणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या काही काळापासून रेशनच्या धान्याचा वाढता काळाबाजार रोखण्यासोबतच बुलडाणा जिल्हय़ातील स्वस्त धान्य वितरण यंत्रणेला व्यवस्थेमध्ये झालेल्या बदलाबाबत सूचित करण्यासोबतच ई-पॉज मशीन फ्रेंडली हाताळण्याबाबतचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण शेगाव येथे २६ ऑक्टोबर रोजी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यशाळेसाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक हे स्वत: हजर राहून जिल्हय़ातील एकंदरीत स्थितीचा आढावा घेणार आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागातील कामकाजासोबतच धान्य वि तरण प्रणालीमध्ये पारदर्शकता निर्माण करण्याच्या दृष्टीने या विभागाचे डिजिटलायजेशन करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्हय़ातील एक हजार ५६७ दुकानामध्ये ई-पॉज मशीन लावण्यात आल्या असल्या तरी त्या योग्य पद्धतीने हाताळल्या जात नसल्याची ओरड आहे. त्यातच गेल्या काही काळात जिल्हय़ात स्वस्त धान्य दुकानातील माल काळ्य़ा बाजारात विक्रीस जात असल्याच्या काही घटना उघडकीस आल्या हो त्या. खामगाव, चिखली, लव्हाळासह जिल्हय़ातील काही ठिकाणी रेशनचे काळ्य़ा बाजारात जाणारे धान्य जप्त करण्यात आले होते. पुरवठा विभागातील कर्मचार्यांनी प्रशासकीय पा तळीवरील कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करीत गेल्या आठवड्यात आंदोलन केले होते. या पृष्ठभूमीवर गुरुवारी शेगावमध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या उपस्थितीमध्ये ही कार्यशाळा होत असल्याने याला महत्त्व आले आहे. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात ही कार्यशाळा होत असून, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापटही या कार्यशाळेत आवर्जून उ पस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले; मात्र अद्याप त्या संदर्भात त्यांचा अधिकृत दौरा स्पष्ट झालेला नाही.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील मोठय़ा जिल्हय़ांपैकी एक असलेल्या आणि तब्बल १३ तालुके असलेल्या बुलडाणा जिल्हय़ातील रेशननिंग व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणण्यासोबतच नवीन कायदे व डिजिटल यंत्रणा कशी हा ताळावी या दृष्टीने या कार्यशाळेत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नाही म्हणायला बुलडाणा जिल्हय़ात तब्बल १७ लाख नागरिकांना रेशनिंगद्वारे धान्य पुरवठा केला जातो. या कार्यशाळेस जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह पुरवठा विभागाचे बहुतांश कर्मचारी उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. सोबतच जिल्हय़ातील रेशन दुकानदारही या कार्यशाळेत मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत.
दुकानदारांना दिलासा
गेल्या महिन्यात रेशन दुकानदारांचे माजिर्न वाढविण्यात आले असून, प्रती क्विंटल ते दीडशे रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे दुकानदारांचीही गेल्या प्रदीर्घ कालावधीपासून असलेली माजिर्न वाढविण्याची मागणी पूर्णत्वास गेली आहे.