मेंदूत ताप गेल्यामुळे प्रियंकाची मृत्यूशी झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 10:51 PM2017-08-27T22:51:54+5:302017-08-27T22:52:22+5:30
मोताळा तालुक्यातील कोर्हाळा बाजार येथील िप्रयंका शंकर गरु डे या १0 वर्षीय मुलीच्या मेंदूत ताप गेल्यामुळे ती मृत्यूशी झुंज देत आहे; परंतु वडिलांची परिस्थिती हालाखीची असून, तिला उपचारासाठी मदतीची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव बढे: मोताळा तालुक्यातील कोर्हाळा बाजार येथील िप्रयंका शंकर गरु डे या १0 वर्षीय मुलीच्या मेंदूत ताप गेल्यामुळे ती मृत्यूशी झुंज देत आहे; परंतु वडिलांची परिस्थिती हालाखीची असून, तिला उपचारासाठी मदतीची गरज आहे.
वडिलांची हालाखीची परिस्थिती असतानासुद्धा त्यांनी मुलीसाठी सुमारे एक लाख रुपये खर्च केलेत. प्रियंका गेल्या काही दिवसां पासून आजारी आहे. तिच्यावर औरंगाबाद येथे खासगी रुग्णालया त उपचार सुरू आहे. डॉक्टरांनी सुमारे ३ लाख रुपये खर्च सांगि तला आहे. त्यामुळे समाजाचे दातृत्व प्रियंकाला जीवनदान देऊ शकते. त्यासाठी समाजाने पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी िप्रयंकाच्या मदतीसाठी मदत करण्याचे आवाहन स्वाभिमानी शे तकरी संघटनेचे प्रदीप शेळके यांनी केले आहे.