अत्याचारमुक्त महाराष्ट्रनिर्मिताला प्राधान्य द्यावे : प्रा. कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:23 AM2021-07-11T04:23:58+5:302021-07-11T04:23:58+5:30

जून महिन्यात चितोडा-अंबिकापूर येथे दोन कुटुंबांतील वादानंतर निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण पाहता बुलडाण्यातील पत्रकार भवनामध्ये पत्रकार परिषद घेत ही ...

Priority should be given to oppression-free Maharashtra: Pvt. Gates | अत्याचारमुक्त महाराष्ट्रनिर्मिताला प्राधान्य द्यावे : प्रा. कवाडे

अत्याचारमुक्त महाराष्ट्रनिर्मिताला प्राधान्य द्यावे : प्रा. कवाडे

Next

जून महिन्यात चितोडा-अंबिकापूर येथे दोन कुटुंबांतील वादानंतर निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण पाहता बुलडाण्यातील पत्रकार भवनामध्ये पत्रकार परिषद घेत ही मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत पीरिपाचे पदाधिकारी चरणदास इंगोले, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळवे, विजय गवई यांच्यासह अन्य उपस्थित होते. चितोडा येथील वाद सामंजस्याने मिटविण्याऐवजी वादग्रस्त वक्तव्य खा. प्रतापराव जाधव आणि आ. संजय गायकवाड यांनी केल्याचे ते म्हणाले. दरम्यान, चितोडा येथील हिवराळे कुटुंबावर दरोड्यासारखे गुन्हे दाखल करण्याचे आ. गायकवाड सांगतात. सोबतच फौज आणण्याचे वादग्रस्त विधान करतात त्यासाठी ‘मातोश्री’चा संदर्भ देतात. यात एक प्रकारे सर्वसमावेशक भूमिका असलेल्या ‘मातोश्री’चीच बदनामी केल्यासारखा हा प्रकार असल्याचे ते म्हणाले. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आ. संजय गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. या प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृह राज्यमंत्र्यांचीही भेट घेऊन याबाबत त्यांना माहिती देणार असल्याचे कवाडे म्हणाले.

--न्याय न मिळाल्यास मोर्चा--

याप्रकरणी योग्य न्याय न मिळाल्यास बुलडाण्यात मोर्चा काढणार असल्याचे प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले. सोबतच चितोडा येथे आपण शांतता नांदावी यासाठी तेथे जाऊन दोन्ही कुटुंबीयांची भेट घेणार होतो. वादग्रस्त विधान करण्याची आपली भूमिका नव्हती, मात्र पोलिसांनी आदेश थोपवून आपल्याला जाऊ दिले नाही. त्यामुळे पीडित कुटुंबीयांची आपण खामगावात भेट घेतल्याचे ते म्हणाले. सामाजिक समतोल व सद्‌भावना निर्माण व्हावी ही आपली भूमिका असल्याचेही ते म्हणाले.

--खा. जाधवांची ईडीमार्फत चौकशी व्हावी--

चितोडा प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या एकाच कुटुंबाकडे खा. प्रतापराव जाधव गेले. तेथे वादी पक्षाकडे एवढा पैसा कोठून आला असे वक्तव्य करणाऱ्या खा. जाधव यांची तर ईडीमार्फत अर्थात सक्त वसुली संचालनालयाकडून चौकशी व्हावी, अशी मागणीही पत्रकार परिषदेत त्यांनी प्रा. कवाडे यांनी केली.

Web Title: Priority should be given to oppression-free Maharashtra: Pvt. Gates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.