बाजार समितीचे आर्थिक स्रोत बळकटीकरणास प्राधान्य- बुधवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:32 AM2021-02-07T04:32:36+5:302021-02-07T04:32:36+5:30
बुलडाणा : येथील बाजार समितीचे आर्थिक स्रोत बळकटीकरणास प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन बाजार समितीचे मुख्य प्रशासक तथा ...
बुलडाणा : येथील बाजार समितीचे आर्थिक स्रोत बळकटीकरणास प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन बाजार समितीचे मुख्य प्रशासक तथा जिल्हा शिवसेना प्रमुख जालिंधर यांनी दुधा येथे केले. दरम्यान, बुलडाणा बाजार समितींतर्गत आता उपबाजार समित्यांमध्ये लवकरच पेट्रोलपंप सुरू करण्यासोबतच शेतकऱ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुधा येथील उपबाजार समितीला ६ जानेवारी रोजी त्यांनी भेट देऊन तेथील पाहणी केली. गुरांच्या आठवडी बाजाराची पाहणी करून शेतकऱ्यांना तथा व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. सोबतच दुधा उपबाजार समितींतर्गत प्रसंगी येत्या काळात शेतकरी भवनही उभारण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
(फोटो आहे)
दुसरीकडे बुलडाणा बाजार समितींतर्गत नवीन इमारत उभारण्यासोबतच व्यापारी गाळे उभारण्यात येऊन बाजार समितीचा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत अधिक बळकट करण्यात आल्याचे बुधवत म्हणाले. यासोबतच उपबाजार समितीस्तरावरही पेट्रोलपंप उभारून त्यातून बाजार समितीच्या उत्पन्नात भर टाकण्याचा प्रयत्न राहील. बुलडाणा बाजार समितीमध्ये स्वच्छ पाणी, शौचालय, अंतर्गत रस्ते चांगले करून शेतकऱ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांच्या समवेत तालुका प्रमुख लखन गाडेकर, युवासेना उपतालुका प्रमुख दादाराव राऊत, बाजार समितीचे कर्मचारी दिगंबर दांदडे, सुनील काळवाघे, गवई, निकम यांच्यासह अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते.