जास्त शिक्षा असलेल्या कैद्यांना पाठविले जाते दुसऱ्या जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 01:14 PM2020-10-30T13:14:09+5:302020-10-30T13:14:19+5:30

गुन्हेगारांना कोरोनाच्या काळात पॅरोलवर जेलमधून बाहेर काढण्यात आलेेले नाही.

Prisoners with higher sentences are sent to another district | जास्त शिक्षा असलेल्या कैद्यांना पाठविले जाते दुसऱ्या जिल्ह्यात

जास्त शिक्षा असलेल्या कैद्यांना पाठविले जाते दुसऱ्या जिल्ह्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पाच वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या कैद्याना अकोला, अमरावती जिल्हा कारागृहामध्ये पाठविण्यात येते. त्यामुळे बुलडाणा जिल्हा कारागृहामधून गुन्हेगारांना कोरोनाच्या काळात पॅरोलवर जेलमधून बाहेर काढण्यात आलेेले नाही. परंतू कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात ३३ गुन्हेगारांची तात्पुरत्या जामीनावर सुटका केली होती. 
कोरोरा विषाणू संसर्ग पाहता राज्यातील विविध कारागृहातून कैद्यांची तात्पुर्त्या जामीनावर सुटका करण्यात आली होती. बुलडाणा जिल्हा कारागृहातील कैद्यांचाही यामध्ये समावेश होता. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी कैद्यांच्या तात्पुर्त्या सुटकेचा निर्णय घेण्यात आला होता.

Web Title: Prisoners with higher sentences are sent to another district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.