खासगी बसचालकास ८ हजार रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:32 AM2021-05-01T04:32:58+5:302021-05-01T04:32:58+5:30

कोरोना मृत्यूचा चारशेचा आकडा पार बुलडाणा: कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढले असून, जिल्ह्यात गुरुवारी मृत्यूचा आकडा चारशेच्यावर गेला आहे. ...

Private bus driver fined Rs 8,000 | खासगी बसचालकास ८ हजार रुपये दंड

खासगी बसचालकास ८ हजार रुपये दंड

Next

कोरोना मृत्यूचा चारशेचा आकडा पार

बुलडाणा: कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढले असून, जिल्ह्यात गुरुवारी मृत्यूचा आकडा चारशेच्यावर गेला आहे. गुरुवारला कोरोनावर उपचार घेत असताना दुर्गा नगर, नांदुरा, देऊळगाव घाट, सिंदखेड राजा, खैरव ता. देऊळगाव राजा, शिवणी पिसा ता. लोणार व सैलानी ता. बुलडाणा येथील रुग्णंचा मृत्यू झाला.

करवसुलीसह कोरोना जनजागृती!

बुलडाणा: जिल्ह्यातील नगर पालिकांकडून १०० टक्के करवसुलीसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. सध्या कोरोनाची भीती नागरिकांमध्ये असल्याने पालिका कर्मचारी करवसुलीसोबतच कोरोनाबाबत जनजागृती करताना दिसून येत आहेत.

झुडपी जंगलाचे प्रमाण दहा टक्क्यांवर

बुलडाणा: पश्चिम वऱ्हाडात २० हजार २३५ चौ. किमी क्षेत्र हे जंगलांनी व्यापले असले तरी त्यातील १० टक्के वनक्षेत्र हे झुडपी जंगल म्हणून गणल्या जात आहे. प्रामुख्याने विदर्भामध्येच झुडपी जंगलाचे प्रमाण अधिक असून बुलडाणा जिल्ह्यात १६२ चौ. किमी क्षेत्रावर झुडपी जंगल आहे.

औद्योगिक उत्पादन निर्देशांकासाठी वेबपोर्टल

बुलडाणा : राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे अनावरण ऑनलाइन पद्धतीने पार पडले. जिल्ह्यामधील निवडलेल्या ५६८ कारखान्यांकडून दरमहा विहीत कालावधीत माहिती या वेबपोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाच्या महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांच्यावर देण्यात आली आहे.

शाळांची वीज देयके थकले

बुलडाणा : एकीकडे ई-लर्निंगला प्राधान्य दिल्या जात असतानाच वीज देयके थकीत झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. सर्वत्र ऑनलाइन शिक्षण सध्या सुरू आहे. परंतु वीज देयके थकल्यामुळे डिजिटल झालेल्या शाळांना अडचणी येत आहेत.

कांदा बीजोत्पादन काढणीला

मेहकर: तालुक्यातील कोराडी प्रकल्प शंभर टक्के भरला होता. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह उन्हाळी पीक पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. रब्बी हंगामात हिवरा आश्रम शिवारात प्रगतशील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील बीजोत्पादन कांदा लागवड केली आहे. अनेकांचा कांदा बीजोत्पादन काढणीला आलेला आहे.

पाणंद रस्त्याच्या दुरस्तीची गरज

किनगावराजा : हिवरखेड ते बारलिंगा हा गावाकडील पाणंद रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. बारलिंगा, खैरव, टाकरखेड येथून येणारे बरेच नागरिक या रस्त्याने किनगावराजाकडे बाजारपेठेसाठी येत असतात. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांसह या सर्व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

हरभऱ्याला ५ हजार हजार रुपये भाव

बुलडाणा: हरभरा प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार रुपये दराने विक्री होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सध्या हरभरा पडून आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्याने शेतकरीही अडचणीत आले आहेत.

हात धुण्याचे आवाहन

लोणार : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोनाची त्रिसूत्री पाळा, प्रत्येकाने वारंवार हात धुवा व बाहेर पडू नका असे आवाहन, लोणार नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

एसटी महामंडळाचे नुकसान

बुलडाणा: येथील आगारामधून जाणाऱ्या खामगाव, मेहकर, चिखली बसेसाठी प्रवाशी मिळत नसल्याने एसटी महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लाॅकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे एसटी बसने प्रवासी जात नाहीत.

घरकुल अनुदानाचा प्रश्न

सुलतानपूर: घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्याचे अनुदान मिळणार या आशेने अनेकांनी पूर्वीचे घर पाडले आहे. नव्या घरकुलाच्या आशेने कुटुंब उघड्यावर आले आहे. घरकुल अर्ध्यावर राहिले अन उसनवारी केल्याने अर्थिक अडचणही वाढली. परंतु घरकुल अनुदानाचा प्रश्न कायम आहे.

आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा तुटवडा

बुलडाणा : जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होण्याचे प्रकार वाढले आहेत. रुग्णालयात नियमित आवश्यक असणारी औषधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सोसावा लागतो.

बाजार स्थगित केल्याने नागरिकांची तारांबळ

डोणगाव : येथील बुधवारी भरणारा आठवडी बाजार स्थगित करण्यात आल्याने भाजीपाला विक्रेते व व्यावसायिकांसह नागरिकांची तारांबळ उडाली. बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे. हातगाडीवर भाजीपाला ठेवून गावात घरोघरी विकावा लागत आहे.

Web Title: Private bus driver fined Rs 8,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.