खासगी बसची मोटारसायकलला धडक, युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:21 IST2019-04-19T23:21:07+5:302019-04-19T23:21:11+5:30
खासगी बसने मोटारसायकलला उडविल्याची घटना शेलापूरनजीक १९ एप्रिलरोजी रात्री ९.३० वाजता घडली.

खासगी बसची मोटारसायकलला धडक, युवक ठार
शेलापूर: खासगी बसने मोटारसायकलला उडविल्याची घटना शेलापूरनजीक १९ एप्रिलरोजी रात्री ९.३० वाजता घडली. यामध्ये तळणी येथील शुभम बोदडे हा युवक जागेवरच ठार झाला.
याबाबत सविस्तर असे की, मेहकर - सुरत ही खासगी बस रस्त्याने जात होती. दरम्यान शेलापूर नजीक या खासगी बसने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली. मोटारसायकल खासगी बसमध्ये अडकल्याने अर्धा किलोमिटरपर्यंत मोटारसायकल फरफटत गेली. जेव्हा नागरिकांनी आरडाओरड केली. तेव्हा बसचालकाने बस थांबवली. नागरिकांनी बसचालकास चोप दिला. ही घटना बोराखेडी पोलिस स्टेशनअंतर्गत घडली. मात्र मलकापूर हद्दीत या खासगी बसने प्रवेश केल्याने मलकापूर शहर पोलिस स्टेशनला जमा करण्यात आली आहे.