खासगी डीसीसीसी केंद्राचे नियमित होणार ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:34 AM2021-04-17T04:34:57+5:302021-04-17T04:34:57+5:30
कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती तथा रेमडेसिविरचा तुटवडा ऑक्सिजनचा तुटवडा पाहता कोरोना संदर्भातील अैाषधांचा प्रसंगी काळाबाजार होण्याची शक्यता पाहता प्राधान्य ...
कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती तथा रेमडेसिविरचा तुटवडा
ऑक्सिजनचा तुटवडा पाहता कोरोना संदर्भातील अैाषधांचा प्रसंगी काळाबाजार होण्याची शक्यता पाहता प्राधान्य क्रमाने संबंधित रुग्णालयातील रुग्णांच्या देयकांचे ऑडिट करून त्यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवणे या ११ ही अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.
यासंदर्भात आपत्ती निवारण कायदा आणि साथरोग कायद्याचा आधार घेत जिल्हाधिकारी यांनी १३ ही तालुक्यातील या खासगी रुग्णालयांसाठी संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, आता खासगी डेडिकेटेड कोविड केअर सेंटरचेही नियमित ऑडिट होणार असल्याने जादा दर लावून देयके देण्याचे प्रमाणही आता घटणार आहे. अधिकाऱ्यांचा या खासगी रुग्णालयांवर आता वॉच राहणार आहे.
--हलगर्जी केल्यास कारवाई--
नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी अनुषंगिक कार्यात हलगर्जी केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंध कायद्याच्या अधीन राहून कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी स्पष्ट केले आहे.