निवडणुकीच्या कामात प्रथमच धावणार खाजगी वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 06:17 PM2019-04-16T18:17:15+5:302019-04-16T18:17:40+5:30
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच शासकीय वाहनांबरोब खाजगी वाहनेही धावताना दिसणार आहेत.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: निवडणुकीमध्ये मतदान यंत्र, अधिकारी व कर्मचारी यांना मतदान केंद्रावर पोहचविणे व परत आणण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने एसटी महामंडळाच्या किंवा इतर शासकीय वाहनांचा वापर करण्यात येतो; मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच शासकीय वाहनांबरोब खाजगी वाहनेही धावताना दिसणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील ४६ मिनी स्कुल बसची मागणी करण्यात आली असून, संस्थाचालकांचे संमतीपत्र घेण्यात आले आहे.
बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या पूर्वसंधेला सर्व मतदान केंद्रावर मतदान यंत्र, निवडणूक अधिकारी, कर्मचार पोहचविण्यासाठी यापूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस आरक्षीत ठेवल्या जात होत्या. आता एसटी महामंडळाच्या बसेसबरोबरच जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयाच्या मिनी बस व काही खाजगी वाहनांचीही मागणी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या कामात प्रथमच खाजगी वाहनांचा वापर होत आहे. या वाहनांद्वारे अधिकारी व कर्मचाºयांनी साहित्यासह नेण्यासाठी ४१८ वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. तर ४६ मिनी बसेसच मागणी करण्यात आलेली आहे. त्यासाठी ज्या शाळेची मिनी बस आहे, त्या संस्थाचालकाचे संमतीपत्र निवडणूक विभागाने घेतले आहे. त्यानुसार सर्व वाहनांचे नियोजन निवडणूक विभागाने करण्यात आले आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान संपल्यानंतर लोकसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावरून पुन्हा अधिकारी, कर्मचारी, मतदान यंत्र सुरक्षित ठिकाणी आणणार आहेत.
२५८ एसटीबसेस
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीबसेसचीही मागणी निवडणूक विभागाने केलेली आहे. निवडणूक कार्यालयाकडून परिवहन महामंडळाच्या २५८ बस गाड्यांचे आरक्षण केले आहे. मतदान केंद्रावरील शासकीय मंडळींना साहित्यासह सुरक्षित नेण्याची जबाबदारी एसटीवर सोपविण्यात आलेली आहे. त्यासाठी परिवहन महामंडळाकडून एसटी बस व चालक पुरविण्यात येणार आहे.
वन विभाग वगळला
निवडणूक कामासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाची वाहने मागविण्यात आलेली आहे. परंतू वन विभागाच्या वाहनांचा यामध्ये समावेश नाही.
वाहन भाडे
निवडणुकीच्या कामात वापरणाºया येणाºया खाजगी वाहनांना आरटीओच्या दाराने वाहन भाडे दिले जाणार आहे.
एकूण वाहने ७१२
एसटी महामंडळाच्या बसेस, मिनी स्कुल बस, खाजगी वाहने, व शासकीय वाहने असे सर्व मिळून वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.