रस्ते विकासामधील वन जमिनीचे प्रश्न मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:31 AM2021-01-18T04:31:47+5:302021-01-18T04:31:47+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात रस्ते विकासाची विविध कामे सुरू आहेत. बहुतांश कामे ही राष्ट्रीय महामार्गाची आहेत. मात्र काही रस्ते विकासात ...

The problem of forest land in road development will be solved | रस्ते विकासामधील वन जमिनीचे प्रश्न मार्गी लागणार

रस्ते विकासामधील वन जमिनीचे प्रश्न मार्गी लागणार

Next

बुलडाणा : जिल्ह्यात रस्ते विकासाची विविध कामे सुरू आहेत. बहुतांश कामे ही राष्ट्रीय महामार्गाची आहेत. मात्र काही रस्ते विकासात वन विभागाच्या जमिनींचा अडसर येत आहे. हा वन जमिनीचा रस्ते विकासातील अडसर दूर करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी १३ जानेवारी रोजी केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत चर्चा केली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते कामातील वन विभागाच्या जमिनीचे सर्व प्रश्न सोडवून रस्त्यांची कामे जलद गतीने पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

याबाबत राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांनीसुद्धा १३ जानेवारी रोजी मुंबई येथे बैठक घेतली आहे. त्यांनी वन विभागाकडून परवानगीसाठी प्रलंबित असलेले प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे राहेरी येथील पुलाच्या विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली. राहेरी पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामी वाहनधारकांना दुरवरून वाहनांची ये - जा करावी लागते. तसेच या भागातील किरकोळ व्यवसाय करणारे व्यावसायिक, हॉटेल चालक यांचे व्यवसाय डबघाईस आले. त्यामुळे या पुलाला पर्याय म्हणून जुना नागपूर डाक लाईन रस्त्यावरील कमी उंचीचा कमानी पूल बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. या कामाची ई- निविदासुद्धा करण्यात आली आहे. हे काम पूर्ण होऊन राहेरीचा पूल बंद असल्यामुळे त्रास होत असलेल्या जड वाहतूकदारांचा त्रास नक्की वाचणार आहे. तसेच परिसरातील नागरिकांनाही सुविधा होणार आहे.

Web Title: The problem of forest land in road development will be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.