मूग, उडीद खरेदी-विक्रीत अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 07:27 PM2017-09-25T19:27:36+5:302017-09-25T19:30:03+5:30

बुलडाणा : शासनाने उडीद ५ हजार ४०० रुपये व मूग ५ हजार ५७५ रुपये क्ंिवटल हमीभाव जाहीर केला असून, या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने माल खरेदी केल्यास संबंधीत व्यापाºयाविरुद्ध कार्यवाही करण्याचे पणन संचालनालयाचे आदेश आहेत. परंतु, गत आठवड्यात झालेल्या पावसामुळे मूग व उडीद डागाळला असल्याने नाफेडच्यावतीने खरेदी करण्यात येत आहे. या डागी मालाला आधारभूत किंमत मिळत नसून, जिल्ह्यात मूग, उडीद खेरेदी- विक्री गोत्यात अडचणीत सापडली आहे.

Problems with Mood, urine and selling | मूग, उडीद खरेदी-विक्रीत अडचणी

मूग, उडीद खरेदी-विक्रीत अडचणी

Next
ठळक मुद्देआधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने खरेदी  केल्यास कार्यवाही डागी मालाने वाढल्या अडचणी

ब्रम्हानंद जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : शासनाने उडीद ५ हजार ४०० रुपये व मूग ५ हजार ५७५ रुपये क्ंिवटल हमीभाव जाहीर केला असून, या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने माल खरेदी केल्यास संबंधीत व्यापाºयाविरुद्ध कार्यवाही करण्याचे पणन संचालनालयाचे आदेश आहेत. परंतु, गत आठवड्यात झालेल्या पावसामुळे मूग व उडीद डागाळला असल्याने नाफेडच्यावतीने खरेदी करण्यात येत आहे. या डागी मालाला आधारभूत किंमत मिळत नसून, जिल्ह्यात मूग, उडीद खेरेदी- विक्री गोत्यात अडचणीत सापडली आहे.
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या नविन मूग, उडीद आदी माल विक्रीसाठी येत आहे. सन २०१७-१८ या खरीप हंगामातील मूग व उडीद या पिकांसाठी शासनाने हमीभाव जाहीर केलेला आहे. त्यामध्ये मूग या पिकाला ५ हजार ५७५ रुपये व उडीद पिकाला ५ हजार ४०० रुपये हमीभाव देण्यात आला आहे. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मूग, उडीद या शेतमालाची न्युनतम आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने माल खरेदी होते. त्यामुळे शेतमालाची खरेदी आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमतीत खरेदी केली असल्यास संबंधीत खरेदीदार व्यापाºयाविरुद्ध अधिनियमानुसार तात्काळ कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश पणन संचालनालयांनी दिलेले आहेत. परंतू गत आठवड्यामध्ये जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे मूग व उडीद पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. उडीद सोंगणीच्या वेळातच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांनी सोंगून टाकलेला व शेतात सुडी लावलेला उडीद भिजला. त्यामुळे उडीद पिकाचा दर्जा ढासळला. परिणामी सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ओला झालेला व डागी लागलेला शेतमाल विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे डागी शेतमालाला व्यापाºयांकडून हमीभाव दिला जात नाही. हमीभाव मिळत नसल्याने शेतकºयांचेही नुकसान होत आहे.  तसेच आधारभूत किंमतीपेक्षा कमी दर दिल्यास व्यापाºयांवर कार्यवाही होऊ शकते, या परिस्थीतीमुळे व्यापारी व शेतकरी दोघेही अडचणीत सापडले आहेत.

पावसाने सडला अनेकांचा शेतमाल
गत आठवड्यात झालेल्या पावसाने अनेकांचा उडीद, मूग आदी शेतमाल सडला.  तर ज्या शेतकºयांनी शेतात उडीद पिकाची सुडी लावून ठेवली होती, त्यांच्या शेतमालाचेही मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. काहींच्या मूगाला बुरशी सुद्धा लागली आहे. त्यामुळे अशा शेतमालाची विक्री करणे शेतकºयांना अवघड झाले आहे.

बाजार समितीतून जातो माल वापस
उडीद सोंगणीच्या वेळेस झालेल्या पावसाने पिकांचा दर्जा घसरला.  त्यामुळे दर्जा घसरलेल्या शेतमालाची खरेदी करण्यास व्यापारी नकार देत आहेत. हमीभाव न दिल्यास कार्यवाही होण्यापेक्षा खराब माल न स्विकारलेलाच बरे, या धोरणाखाली व्यापारी   दर्जा घसरलेला शेतमाल खरेदी करण्यास टाळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागात कृषी उत्पन्न  बाजार समितीतून शेतकºयांना शेतमाल वापस घेवून जावे लागत आहे.

नविन मूग व उडीद बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत आहे. परंतु गत आठवड्यात झालेल्या पावसामुळे डागी शेतमाल बाजार समितीमध्ये येत असल्याने या मालालाही शासनाने योग्य दर द्यावे. तसेच शासनाने हमीभावाने मूग, उडीद या शेतमालाची खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करावे.
- माधवराव जाधव, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती,

Web Title: Problems with Mood, urine and selling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.