आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 03:15 PM2020-01-22T15:15:26+5:302020-01-22T15:16:33+5:30

२०२०-२१ या वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी नव्याने समावेश करावयाच्या शाळांची नोंदणी पोर्टलवर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Process Starting of the RTE Admission | आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला २१ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात गटशिक्षणाधिकारी स्तरावर आरटीई अंतर्गत येणाऱ्या जुन्या शाळा व नोंदणी झालेल्या नवीन शाळांची पडताळणी आजपासून करण्यात येत आहे. या पडताळणीसाठी व शाळांच्या नोंदणीसाठी ६ फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे.
बालाकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनिमयानुसार खाजगी विनआनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेला २१ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. २०१९-२० या वर्षी नोंदणी झालेल्या आरटीई २५ टक्के पात्र शाळांचे आपोआप नोंदणी करणे, तसेच या सर्व शाळांची गटशिक्षणाधिकारी स्तरावरून पडताळणी करण्याची प्रक्रिया पहिल्या टप्प्यात सुरू झाली आहे. त्यासाठी स्थलांतरीत शाळा, नव्याने अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त झालेल्या शाळा, अल्पसंख्यांक शाळा विचारात घेऊन ही कार्यवाही करण्यात येत आहे. ही प्रवेश प्रक्रिया ही आॅनलाईन पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये एकाचवेळी राबविण्यात येत आहे. पात्र खाजगी विना अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक यांनी याबाबत पालकांना सुचीत करणे बंधनकारक आहे. सर्व प्रथम आरटीई प्रवेश पात्र शाहांनी इयत्ता पहिलीचा डेटा सरल पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे. त्यानंतरच २०२०-२१ करीता नोंदणीची प्रक्रिया मुदतीत पूर्ण करता येणार आहे. अन्यथा आरटीई पोर्टलवर नोंदणी व पडताळणी करताना आरटीई २५ टक्के जागा अपडेट करता येणार नाही. २०२०-२१ या वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी नव्याने समावेश करावयाच्या शाळांची नोंदणी पोर्टलवर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यावर्षी एकाच टप्प्यात प्रवेशाची लॉटरी
यावर्षी आरटीई २५ टक्के अंतर्गत राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी तीन टप्प्याऐवजी एकाच टप्प्यात प्रवेशाची लॉटरी काढली जाणार आहे. शाळेत रिक्त जागांएवढीच प्रतीक्षा यादी तयार करून अनुक्रमे प्रतिक्षा यादीवरील विद्यार्थ्यांची प्रवेश यादी प्रसिद्ध करण्यात येवून याबाबत पालकाचे रजिस्टर क्रमांकावर सुद्धा संदेश पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे या एकंदरीत प्रक्रियेकडे आतापासूनच पालकवर्गाचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत तीन ते चार टप्प्यात ही प्रक्रिया होत होती.

Web Title: Process Starting of the RTE Admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.