लाॅकडाऊनमुळे व्यावसायिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:32 AM2021-04-13T04:32:53+5:302021-04-13T04:32:53+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. अनेकांचे प्राणही गेले आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊनचा ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. अनेकांचे प्राणही गेले आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. याचा फटका व्यावसायिकांना बसत असून चहा, पानटपरी, हाॅटेल व सलून यासारखे लहानसहान व्यवसाय करणारे व्यावसायिक बेरोजगार झाले आहेत. कुटुंबातील सदस्यांसह ज्येष्ठ नागरिक चिंतेत पडले आहे. ज्याप्रमाणे शासनाद्वारे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचप्रमाणे छोट्या दुकानदारांनाही निर्धारित वेळ ठरवून देत दुकान उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती हलाखीची होती. आता यंदाही तीच स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, छोटे व्यावसायिक संकटात अडकले असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, अशी चिंता त्यांना सतावत आहे.