छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेचा संवेदीकरण कार्यक्रम

By ram.deshpande | Published: July 25, 2017 07:48 PM2017-07-25T19:48:31+5:302017-07-25T19:48:52+5:30

बुलडाणा - छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनाच्या संवेदीकरण कार्यक्रम सहकार विद्या मंदीराच्या सभागृहात नुकताच पार पडला. या कार्यक्रमात व्ही.एल.ई केंद्र चालकांना कृषी सन्मान योजनेचे ऑनलाईन अर्ज शेतकऱ्यांना भरून देण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Program of Chhatrapati Shivaji Maharaj Krishi Samman Yojna | छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेचा संवेदीकरण कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेचा संवेदीकरण कार्यक्रम

Next
ठळक मुद्देशेतकर्‍यांना ऑनलाईन अर्ज भरून देण्यासाठी सहकार्य करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा - छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनाच्या संवेदीकरण कार्यक्रम सहकार विद्या मंदीराच्या सभागृहात नुकताच पार पडला.
या कार्यक्रमात व्ही.एल.ई केंद्र चालकांना कृषी सन्मान योजनेचे ऑनलाईन अर्ज शेतकऱ्यांना भरून देण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले. हे अर्ज जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी भरून द्यावेत, असे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले. यावेळी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रभाकर श्रोते, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुभाष बोंदाडे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, आपले सरकार पोर्टलचे जिल्हा व्यवस्थापक प्रविण वानखडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. चव्हाण, जिल्हा कृषि विकास अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी उपनिबंधक चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजनेची संपूर्ण माहिती विषद केली. आणि संबंधित यंत्रणांची भूमिका सांगितली. तसेच पात्र/अपात्रतेचे निकषांबाबत मार्गदर्शन केले. वानखडे यांनी याप्रसंगी कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्जाविषयी माहिती दिली. त्यांनी आपले सरकार वेबपोर्टलवरील अर्जाच्याबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. अशोक खरात यांनी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आपले सरकार केंद्र चालकांना येणाऱ्या अडचणींचे समाधान केले. ऑनलाईन कामकाज करताना नेटवर्कमधील अडचणींबाबत स्वप्नील कुंवर यांनी उपाययोजना सांगितल्या. यावेळी नाबार्डचे बोंदाडे व श्रोते यांनी योजनेच्या अंमलबजाणीमधील आपले सरकार केंद्र चालकांची व बँकांची असलेली महत्वपूर्ण भूमिका विषद केली. केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना योजेनेचे विनामूल्य ऑनलाईन अर्ज भरण्यास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Web Title: Program of Chhatrapati Shivaji Maharaj Krishi Samman Yojna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.