राजू शेट्टी यांच्या अटकेचा निषेध

By admin | Published: March 9, 2017 01:46 AM2017-03-09T01:46:59+5:302017-03-09T01:46:59+5:30

चिखली येथे राज्य शासनाच्या प्रतिकात्मक पोस्टरचे केले दहन.

Prohibition of Raju Shetty's arrest | राजू शेट्टी यांच्या अटकेचा निषेध

राजू शेट्टी यांच्या अटकेचा निषेध

Next

चिखली(जि. बुलडाणा), दि. ८- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी विधानभवनासमोर कर्जमुक्ती, कांदा, तूर खरेदीमध्ये उद्भवणार्‍या शे तकर्‍यांच्या विविध समस्यांबाबत केलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करून त्यांना अटक करण्याच्या घटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र निषेध व्यक्त करीत ७ मार्च रोजी स् थानिक डी.पी.रोडवर सरकारच्या प्रतीकात्मक पोस्टरचे दहन केले.
सद्यस्थितीत शेतकरी प्रचंड अडचणींचा सामना करीत असताना सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने शेतकर्‍यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणारे खा. राजू शेट्टी यांच्यावर केलेली कारवाई दुर्दैवी असल्याचे स्पष्ट करून त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करीत प्रतीकात्मक पोस्टर जाळून तीव्र निषेध नोंदविला. यावेळी विनायक सरनाईक, नितीन राजपूत, भारत वाघमारे, दीपक सुरडकर, राम अंभोरे, विलास तायडे, विजय सुरूशे, अशोक सुरडकर, भारत जोगदंडे, गणेश भवर, संतोष शेळके, सुनील सन्साने, भागवत म्हस्के आदी उपस्थित होते.
पीक विमा तत्काळ द्या!
शासनाच्या राष्ट्रीय पीक विमा योजना खरीप २0१५ ची पीक विमा नुकसानभरपाई ज्या शेतकर्‍यांनी विमा काढला आहे त्यांना देण्यात आली होती व ज्यांनी विमा काढलेला नाही, त्यांनासुद्धा विमा देणार असल्याची घोषणा शासनाने केली होती. तथापि तसा आदेशदेखील दिला होता; परंतु अनेक महिने उलटूनही पीक विमा मदत मिळत नसल्याने शेतकरी बँक व कृषी विभागाकडे चकरा मारीत आहेत. याची दखल घेता ज्या शेतकर्‍यांनी विमा काढलेला नाही, त्यांना तत्काळ पीक विमा देण्यात यावा व या मदतीची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात तातडीने जमा करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक सरनाईक, जिल्हा सरचिटणीस नितीन राजपूत, तालुकाध्यक्ष दीपक सुरडकर, अनिल चव्हाण, भरत जोगदंडे, अनिल वाकोडे, राम अंभोरे, अशोक सुरडकर, गोपाल परीहार, शेख बबलू शे. रशीद यांनी तहसीलदार यांच्याकडे ६ मार्च रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Prohibition of Raju Shetty's arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.