धक्काबुक्कीचा भाजपकडून निषेध

By Admin | Published: July 15, 2017 12:16 AM2017-07-15T00:16:27+5:302017-07-15T00:16:27+5:30

मेहकर : भाजपच्या श्वेताताई महाले पाटील यांना झालेल्या धक्काबुक्कीचा मेहकर तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने १४ जुलै रोजी निषेध नोंदविण्यात आला.

Prohibition of a shock from the BJP | धक्काबुक्कीचा भाजपकडून निषेध

धक्काबुक्कीचा भाजपकडून निषेध

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : भाजपच्या श्वेताताई महाले पाटील यांना झालेल्या धक्काबुक्कीचा मेहकर तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने १४ जुलै रोजी निषेध नोंदविण्यात आला. तसेच दोषींवर कार्यवाही करण्याबाबत उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी मेहकर यांना भाजपचे तालुका अध्यक्ष अ‍ॅड.शिव ठाकरे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात नमूद आहे, की शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली. मात्र, केवळ राजकीय हेतूने विरोध करण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी १२ जुलै रोजी एल्गार आंदोलन पुकारले. या फसव्या आंदोलनाचे पितळ उघडे पाडण्यासाठी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वात प्रतिआंदोलन पुकारले व आपली भूमिका मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दरम्यान, काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी श्वेतातार्इंना धक्काबुक्की केली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या गैरप्रकाराचा भाजपाकडून निषेध नोंदविण्यात आला. तसेच श्वेताताई महाले पाटील यांना धक्काबुक्की करून मंगळसूत्र तोडणाऱ्या आरोपींविरुद्ध कायदेशीर कार्यवाही व्हावी, अशी मागणी मेहकर भाजपा तालुक्याच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत मोहरील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अर्चना पांडे, अ‍ॅड.शिव ठाकरे, डॉ. सुभाष लोहिया, किरण जोशी, अर्जुनराव वानखेडे, पार्वती कान्हे, चित्रलेखा पुरी, रोशन काबरा, अ‍ॅड. सुरेश जायभाये, गजानन नागोलकर, अ‍ॅड. अमोल काळे, रवींद्र इघवे, संदीप गायकवाड, अझीम जहागीरदार, मोहन अंभोरे, मंगेश निकम, शेख अय्याज कुरेशी, शत्रुघ्न आसोले, संतोष भुयार, रामेश्वर पांडव, विलास परमाळे, प्रल्हाद गायकवाड, देवीदास चव्हाण, शे. बशीर शाह व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Prohibition of a shock from the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.