आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्मितीला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:31 AM2021-03-24T04:31:53+5:302021-03-24T04:31:53+5:30

२० केएल क्षमतेचा हा लिक्वीड टँक आज बुलडाण्याची सरासरी १५ दिवसांची गरज भागवत आहे. त्यामुळे अन्न व अैाषध प्रशासन, ...

Promoting the creation of infrastructure in the health sector | आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्मितीला चालना

आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्मितीला चालना

googlenewsNext

२० केएल क्षमतेचा हा लिक्वीड टँक आज बुलडाण्याची सरासरी १५ दिवसांची गरज भागवत आहे. त्यामुळे अन्न व अैाषध प्रशासन, आरोग्य यंत्रणेला कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेदरम्यान जेथे ऑक्सिजनच्या टँकरसाठी रात्र रात्र जागून काढावी लागत होती. तेथे आता याबाबत स्वयंपूर्णत: आली आहे.

--पदभरतीला मिळाली चालना--

जिल्ह्यात १,८४६ व्यक्तीमागे एक आरोग्य कर्मचारी असे विषमसे प्रमाण गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या दरम्यान होते. २,१४२ डॉक्टरर्स, नर्स, आरोग्यसेवक यांची अवश्यकता असताना त्यापैकी ३१ टक्के पदे रिक्त होती. लॉकडाऊनदरम्यान आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करताना हे मनुष्यबळही उपलब्ध करण्यात बऱ्यापैकी यश आल्यामुळे आरोग्य क्षेत्रातील अनुशेष दूर करण्यास मदत झाली.

--आरोग्य क्षेत्रावर वाढला खर्च--

जिल्ह्याचे स्थूल उत्पन्न हे २४ हजार ६६८ कोटी रुपये आहे. यापैकी नेमका किती हिस्सा हा आरोग्यावर खर्च होतो हेच जिल्ह्यात आतापर्यंत स्पष्ट नव्हते. देशाची तुलना करता जीडीपीच्या ४ टक्के खर्च हा आरोग्यावर खर्च होतो. राज्यात तो ०.५ टक्के आहे. अद्यापही जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रावर स्थूल उत्पन्नापैकी नेमका किती खर्च होतो याची आकडेमोड झाली नसली तरी गेल्या वर्षात त्यात वाढ झाल्याचे स्पष्ट आहे. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी वर्तमान स्थितीत पाच कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले असल्याचीही माहिती आहे.

--रुग्णवाहिका खरेदीला चालना--

जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या २३, तर आरोग्य विभागाकडील २२ रुग्णवाहिकांवर बोजा पडला होता. त्यातच अत्याधुनिक काडिर्याक रुग्णवाहिकांची जिल्ह्याला गरज भासत होती. त्यामुळे आता कोठे आरोग्य विभागाने १३ तालुक्यांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे काडिर्याक रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव बनविण्यास प्रारंभ केला आहे.

Web Title: Promoting the creation of infrastructure in the health sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.