शेतकऱ्यांचा संप : शिवसेना, किसानसेनेने रस्त्यावर ओतले दुध

By admin | Published: June 1, 2017 08:07 PM2017-06-01T20:07:30+5:302017-06-01T20:07:30+5:30

बुलडाणा : शेतकऱ्यांच्या संपाला पाठींबा देत शिवसेनाप्रणित किसान सेनेच्यावतीने सकाळी ८ वाजता बुलडाण्यातील स्टेट बँक चौकात रस्त्यावर दुध ओतून समर्थन देण्यात आले.

The property of the farmers: Shiv Sena, the farmer poured milk on the road | शेतकऱ्यांचा संप : शिवसेना, किसानसेनेने रस्त्यावर ओतले दुध

शेतकऱ्यांचा संप : शिवसेना, किसानसेनेने रस्त्यावर ओतले दुध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कर्जमुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत मागण्यासाठी १ जूनपासून शेतकऱ्यांच्यावतीने स्वयंस्फुर्तीने राज्यभर संप पुकारण्यात आला आहे. या संपाला पाठींबा देत शिवसेनाप्रणित किसान सेनेच्यावतीने सकाळी ८ वाजता बुलडाण्यातील स्टेट बँक चौकात रस्त्यावर दुध ओतून समर्थन देण्यात आले.
शिवसेनेचे नेते खासदार तथा संपर्क प्रमुख प्रताराव जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, शिवसेना नेते संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनामध्ये किसान सेना उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येवून रस्त्यावर दुध ओतून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमुक्ती द्या, स्वामीनाथन आयोग लागू करा, शेती मालाल हमीभाव द्या, दुधाला योग्य दर मिळालाच पाहिजे, भाजीपाल्याला योग्य दर मिळाला पाहिजे, शेतकरी एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देत परिसर दनानून सोडला. यावेळी बुलडाणा शहर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेवून काही वेळांनी किरण पाटील, विजय सोनुने, निलेश बारोटे, सतिष जगताप, गजानन उबरहंडे, अनिल उबरहंडे, रवि उबरहंडे, नंदु उबरहंडे, निलेश काकडे, दिपक काकडे, जगन्नाथ उबरहंडे, गजानन जाधव, दिनकर उबरहंडे, प्रदिप उबरहंडे यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या संपाला काँग्रेसचे समर्थन
राज्यासह जिल्ह्यातील शेतकरी चौफेर संकटाने घेतला असताना त्याला तातडीची मदत देण्याऐवजी पोकळ आश्वासनांचा मारा संवाद यात्रेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे भ्रमनिरास झाल्याने राज्यातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कधी नव्हे ते संपाचे हत्या उपसले आहे. त्याला बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने जाहीर पाठिंबा दिला असून, शेतकऱ्यांच्या या आंदोलनात जिल्हाभरातील काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राहूल बोंद्रे यांनी केले आहे.

 

Web Title: The property of the farmers: Shiv Sena, the farmer poured milk on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.