जिल्ह्यात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद
By admin | Published: June 5, 2017 06:58 PM2017-06-05T18:58:41+5:302017-06-05T18:58:41+5:30
बुलडाणा : शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी राजव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या या बंदला जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी राजव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या या बंदला जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
शेतकरी संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपावरून शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी ५ जून रोजी बंद पुकारण्याचे आवाहन केले होते. या बंदला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, दूध संकलन, भाजीपाला, फळे विक्रीस न आल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील आठवडी बाजारातील भाजीपाल्याची आवकही मंदावली आहे. परिणामी भाज्यांचे दर कडाडले आहेत. जिल्ह्यात बंद पाळून कर्जमाफीबाबत घोषणा देत सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी भाजीपाला, दूध रस्त्यावर टाकून सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला. दरम्यान एसटी महामंडळच्या बसेसही बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच शहरातील किराणा दुकाण, कपडामार्केट व इतर दुकानेही बंद ठेवून शेतकऱ्यांच्या बंदला पाठींबा दर्शवला.